देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला 7 दिवसाची पोलीस कोठडी.
वाल्मीक कराडला खंडणी,देशमुख हत्येतील तपासासाठी ताब्यात.

सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सर्वच आरोपींना मोक्का लावण्यात आला होता. खंडणी प्रकरणातील आरोपी असलेले वाल्मिक कराडला मोक्का लावल्यानंतर, पुढील तपासासाठी एसआयटीने कराडचा ताबा घेतला आहे.आज सकाळी वाल्मीक कराडला केज न्यायालयात हजर केले असता. पुढील सुनावणी केज ऐवजी बीड येथे जिल्हा सत्र न्यायालयात होणार आहे. यामुळे आज दुपारी बीड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलीस मोठ्या प्रमाणत बंदोबस्त होता. दुपारच्या सत्रात सुनावणी सुरू होणार आहे. येथे सरकारी वकील, कराडचे वकील दाखल झाले आहेत. न्यायालयाच्या परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पुढील सुनावणी आता बीड जिल्हा सत्र न्यायालयात होणार आहे. एसआयटी सह पोलीस बंदोबस्तात न्यायालयात दाखल करण्यात आले.वाल्मिक कराडवर काल मोका लावल्यानंतर परळी येथे कराड समर्थकांनी आक्रमक आंदोलन केले. हे आंदोलन आजही सुरू असून, परळी शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलन सुरू केले. तर सिरसाळा, धर्मापुरी येथेही आज कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच परळी येथे काही तरुण मोबाइल टॉवर आणि पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करीत असून या सर्वांची वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी आहे. आज परळी येथील जगमित्र कार्यालयात बैठक घेऊन त्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड कटात सामील असल्याचा ठपका ठेवून मोक्का लावण्यात आला. काल केज कोर्टात हजर करण्यापूर्वीच परळी येथे कराड समर्थकांनी आक्रमक होत आंदोलन केले. तर माझ्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात येत असून, त्याला न्याय द्या म्हणून कराडच्या आईंनी परळी शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. रात्री परळी येथे कराड समर्थक आणि स्वतःला पेटवून घेतल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. देशमुख हत्येच्या दिवशी दुपारी 3:20 मिनिटांनी सूदर्शन घुले, विष्ण चाटे,वाल्मीक कराड या तिघात 10 मिनिट संभाषण झाल्याची माहिती,पुरावे एसआयटीने बीड न्यायालया समोर दिली तर या हत्येतील कृष्णा आंधळे हा आरोपी फरार असून त्याला कोणी मदत केली याची माहिती एसआयटीला हवी असल्यायाने 10 दिवसाची कोठडीची मागणी केली होती,दोन्ही बाजूचा युक्ततिवाद पूर्ण झाला असून 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यायात आली.