बीड न्यायालय परिसरातच कराड समर्थक,वकिलाची घोषणाबाजी.
देशमुख हत्येच्या चौकशीसाठी वाल्मीक कराडला सात दिवसाची पोलीस कोठडी

मस्साजोग सरपंच देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या प्रकरणी या हत्येतील 7 आरोपींना मोक्का लावण्यात आला होता तर काल केज न्यायालयात खंडणीतील आरोपी वाल्मीक कराडला देखील मोकोका लावण्यात आला. यामुळे कराड समर्थक चांगले संतापले असून कालपासून परळी मध्ये आंदोलन करत बाजारपेठ बंद करण्यात आली होती. तर काही समर्थकानी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. आज केज न्यायालयासमोर वाल्मीक कराडला हजर केले असता,त्याला बीड येथील मोक्का न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश दिल्याने वाल्मीक करायला दुपारी बीड न्यायालयात हजर केले असता दुपारी देशमुख हत्या होण्यापूर्वी तीन वाजता वाल्मिक कराड विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तिघात फोनवरून संभाषण झाल्याने हत्या तपासासाठी वाल्मीक करायला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने कराड समर्थक,वकिलांनी न्यायालय परिसरातच घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कराड समर्थकानी न्यायालय परिसरातच पोलिसांसमोर घोषणाबाजी दिल्याने पोलीस व समर्थक यांच्यात बाचाबाची झाली.