बीड कोर्टात आंदोलन,घोषणाबाजी करणाऱ्यावर गुन्हे दाखल.
कराड समर्थक व विरोधक आमने-सामने आले.

मकोका गुन्ह्यातील आरोपी संदर्भात बीड कोर्टात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर शिवाजीनगर पोलीसांकडुन गुन्हे दाखल.
सरपंच देशमुख हत्यात सहभाग आरोप वाल्मीक कराडवर काल केज न्यायालयात मोक्का लावण्यात आल्याने आज बीड मोक्का न्यायालयासमोर हजर केले असता देशमुख हत्या तपासासाठी वाल्मीक कराडला सात दिवसाची सीआयडी कोठडी देण्यात आली. यावर वाल्मीक कराड समर्थकांनी व विरोधकांनी पोलिसा समोरच न्यायालय परिसरातच घोषणाबाजी देण्यास सुरुवात केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे न्यायालयात आंदोलन करणाऱ्या, घोषणा देणाऱ्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मोक्क मधील आरोपी वाल्मीक करायला कोर्टात हजर केल्यानंतर पोलीस वाहनांतुन 16.40 ते 17.00 वा. दरम्यान परत बाहेर घेवून जात असताना बीड कोर्टाचे परीसरात ।) सुनिल श्रीरंग फड वय 50 वर्षे. रा. परळी वैजीनाथ, ता. परळो जिल्हा बीड 2) ज्ञानोबा दगडू मुंडे वय 36 वर्षे, रा. उखळी ता. गंगाखेड, जिल्हा परभणी, 3) जिवन माणीककराड वय 30 वर्षे रा. पिराचीवाडी ता. केज, जि. बीड व इतर अनोळखी 30 ते 35 यांनी गैरकायद्याचो मंडळी जमवून वाल्मीक कराड यांच्या वरील खोटा गुन्हा मागे घ्यावा अशी घोषणाबाजी करुन मा. जिल्हाधिकारी साहेब, बीड यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन सरकारीकामात अडथळा निर्माण केला बाबत विलास श्रीमंतराव मोरे वय 39 वर्षे, व्यवसाय नोकरी सहाय्यक पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, बीड यांचे फिर्यादीवरुन गु.र.नं.29/2025 बी.एन.एस.एस. कलम 132, 221. 189 (2), 189(3), 191(2), 190 सह म.पो.का. कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन तपास चालु आहे.
तसेच बीड कोर्ट परीसरात ।) हेमा श्रीहरी लोमटे (पिंपळे) रा. स्वराज्य नगर, बोड 2) मनिषा गंगाधर कुपकर रा. अंबीका नगर, बीड 3) संगीता कोकाटे व इतर 10 ते 12 महीला यांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन मा. जिल्हाधिकारी साहेब, बीड यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन संतोष देशमुख यांचे मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहीजे अशी घोषणाबाजी करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या बाबत निता गजानन दामधर महीला पोलीस उपनिरीक्षक, शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांचे फिर्यादीवरुन गु.र.नं.30/2025 बी.एन.एस.एस. कलम 132, 221, 189 (2), 189(3), 191(2), 190 सह म.पो.का. कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन तपास चालु आहे.बीड जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश काढले असताना देखील बीड जिल्हा न्यायालयात समर्थक व विरोधकाने पोलिसा समोरच केल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.
तरी बीड पोलीसांकडुन सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, सध्या बीड जिल्ह्यात मा.जिल्हाधिकारी साहेब, बीड यांचे जमावबंदी आदेश लागु असुन कोणीही गैरकायदेशीर जमाव जमवुन बेकायदेशीरपणे आंदोलन करुन सार्वजनीक शांतता भंग होईल असे कृत्य करु नये तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य प्रत्यक्ष अथवा सोशल मिडीयावर करु नये अथवा आक्षेपार्ह मजकुर लिहू नये असे आढळुन आल्यास प्रचलीत कायद्यान्वये संबंधीता विरुध्द गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बीड पोलिसांनी दिली.