ताज्या घडामोडी

विष्णू चाटेची लातूर कारागृहात रवानगी.

विष्णू चाटे ला कोणापासून धोका.?

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी विष्णू चाटेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आल्यानंतर १८ जानेवारीपर्यंत ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, विष्णू चाटेची रवानगी लातूर कारागृहात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात सुरुवातीला ताब्यात घेतल्यानंतर खुनाच्या गुन्ह्यात आणि नंतर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या विष्णू चाटेने सुरुवातीला केज कोर्टात बीड ऐवजी लातूर कारागृहात ठेवावे यासाठी अर्ज केला होता. सुरुवातीला हा अर्ज केज न्यायालयाने फेटाळला होता. मात्र, पुन्हा विष्णू चाटेच्या वकिलाने कोर्टाकडे विनंती केल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ही मागणी कोर्टाने मान्य केली आहे. विष्णू चाटेला नक्की धोका कोणापासून आहे? हा सवाल मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.

सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, प्रतिक घुले, जयराम चाटे, महेश केदार या सहा जणांनी मिळून देशमुख यांची हत्या केली होती. विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत या ८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. आता या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटेला सुरक्षेच्या कारणास्तव लातूरच्या कारागृहात रवानगी केली आहे. संतोष देशमुख प्रकरणातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे याला देण्यात आलेली दोन दिवसांची कोठडी वाढवून १८ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या अपहरणावेळी विष्णू चाटेने ३५ वेळा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांना कॉल करून १५ मिनिटात सोडतो असं सांगत ३६ व्या कॉलला संतोष देशमुखांची डेडबॉडी पाठवली होती. त्यानंतर फोन बंद करून विष्णू चाटे फरार होता. त्यामुळे खंडणीतील आरोपी विष्णू चाटे ला पोलिसांनी बीड जवळील लक्ष्मी चौकातून ताब्यात घेतले होते.त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी सूनावण्यात आली होती, परंतु विष्णू चाटे ने बीड कारागृह ऐवजी लातूर कारागृहात ठेवण्यात यावे अशी विनंती अर्ज न्यायालयाकडे केल्याने त्यांची रवानगी लातूर कारागृहात करण्यात आली.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button