ताज्या घडामोडी

वाल्मीक कराडच्या वाईन शॉपचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द .

ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा देताच ना हरकत प्रमाणपत्र रद्द.

 

 मस्साजोग येथील पवनचक्की अधिकाऱ्याला खंडणीप्रकरणी व सरपंच देशमुख हत्या प्रकरणात तपासासाठी सीआयडीच्या ताब्यात असलेले वाल्मीक कराड चे केज शहरात असलेल्या यांच्या वाईन शॉपला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करावे. अन्यथा नागरिकांच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा दिल्यानंतर सदर ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचे नगराध्यक्ष सीता बनसोड आणि गटनेते हरून इनामदार यांनी सांगितले.या संदर्भात माहिती अशी की केज नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी वाल्मीक कराड यांच्या केज येथील वाईन शॉपसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. सदर प्रमाणपत्र बेकायदेशीर असून ते रद्द करावे अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिला होता. दरम्यान शहरातील काही बार मालकांनी नगरपंचायतमध्ये जाऊन नगराध्यक्षा सीता बनसोड व हरून इनामदार यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी वृत्तपत्रात रीतसर प्रसिद्धी द्यावी लागते, त्यासाठी पंधरा दिवसाचा आक्षेप घेण्याचा कालावधी देण्यात येतो, त्यानंतरच ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते.मात्र कोणतीही नियम न पाळता ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा देताच ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आले.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button