ताज्या घडामोडी
सैफ अली खानवर चाकूने हल्ला

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री त्यांच्या घरी चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्याने चोरीच्या उद्देशाने घरात प्रवेश केला होता. सैफ यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केल्याने चोरट्याने त्यांच्यावर चाकूने वार केले.
सैफ अली खान यांना तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.