ताज्या घडामोडी

देशमुख हत्या प्रकरणी सीआयडी तपास अधिकारी बदलले.

सुदर्शन घुले गॅंगचा लीडर तर वाल्मीक कराड सदस्य ?

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची यासाठी ग्रामस्थांनी, बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आक्रमक पवित्रा घेऊन  या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती.राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निषेध मोर्चे काढले जात आहेत. हातापातीसाठी कडे देण्यात आला होता परंतु त्यातील काही अधिकारी कर्मचारी हे वाल्मीकरांच्या संपर्कात असल्याचे फोटो व माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ते अधिकारी बदलण्याची यावे अशी मागणी देशमुख कुटुंबीय व बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केली होती , त्यामुळे ते अधिकारी बदलले होतें.अशात आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराडवर मोक्का लागताच सीआयडी मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. प्रशासनाकडून तपास अधिकारी बदलण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर करीत होते. मात्र आता त्यांच्या जागी अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील याचा तपास करणार आहेत.खरं तर, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह नऊ जणांवर मकोका लावला आहे. यात सीआयडीने सुदर्शन घुले याला गँगचा लिडर दाखविले आहे, तर वाल्मीक कराडला गँगचा सदस्य म्हटलं आहे. तसेच या गुन्ह्यात आरोपी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजुला मकोका लागताच सीआयडीचे तपास अधिकारी देखील बदलण्यात आले आहेत.

सीआयडीमध्ये अचानक मोठे बदल केल्याने चर्चेला उधाण आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध सीआयडी घेत आहे. त्यामुळे आरोपींनी संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अचानक सीआयडी अधिकारी बदलण्याचे कारण समजले नसून यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.तर  वाल्मीक कराड हा मुख्य मास्टर माईंड व या टोळीचा लीडर असताना देखील घुलेला गँगचा लीडर दाखवल्याने  बीड जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. सीआयडी चा तपास अधिकारी का बदलले याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button