पोलिसांनी वर्दीवर रिल्स केल्यास होणार कारवाई,ट्रॅप झाला तर ठाणे प्रमुख थेट नियंत्रण कक्षात
पोलीस कर्मचाऱ्याला नावाने बोलवा..पो.अ.नवनीत कॉवत

बीड पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पोलिस दलातील कर्मचारी आणि अधिकारी यांना शिस्त लावण्यासाठी आता प्रयत्न सुरू केले आहेत. वर्दीवर असताना रील्स काढून सोशल मीडियावर टाकल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे, तर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप झाला तर ठाणेप्रमुखाची थेट नियंत्रण कक्षात बदली केली जातीयवाद नसावा यासाठी अधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना हाक मारताना त्यांच्या आडनावा ऐवजी थेट नावाने हाक मारावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्याची राज्यभरात नाचक्की झाली. जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेवरही आरोप झाले होते.शनिवारी जनता दरबार प्रत्येक शनिवारी पोलिस ठाण्यात जनता दरबार भरवला जाणार आहे. अनेक नागरिक तक्रारी घेऊन थेट एसपी कार्यालयात येतात. त्याऐवजी जनता दरबारात त्यांच्या तक्रारींवर कारवाई झाली तर त्यांना वरिष्ठांकडे येण्याची गरज पडणार नाही. त्यांच्या तक्रारीही ऐकून घेतल्या जातील. यासाठी गत आठवड्यापासून हा उपक्रम सुरू केला आहे.
…तर प्रमुखांवर कारवाई …
कर्मचारी, अधिकाऱ्यावर एसीबीची कारवाई झाली, ट्रॅप झाला तर यात ठाणेप्रमुखांना दोषी धरले जाईल. नियंत्रण कक्षात बदली करून खात्यांतर्गत चौकशीचे आदेश दिले जातील.चूक झाल्यास थेट कारवाई होणार : पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना सूचना दिल्या आहेत. यापूर्वी काय होते आणि काय झाले याला महत्व नाही. मात्र यापुढे कुठल्याही प्रकारे चूक खपवून घेतली जाणार नाही. झीरो टॉलरन्स पॉलिसी राबवली जाईल. दोर्षीना पाठीशी न घालता कारवाई केली जाईल. – नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड पोलिस दलाल शिस्त लावणे आणि पोलिस दलाची प्रतिमा सुधारणे यासाठी आता नवीन पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. रिल्समुळे पोलिसांची प्रतिमा समाजात नकारात्मक होते. त्यामुळे अशा प्रकारे वर्दीत रील्स केल्यास कारवाई करण्यात येईल, असे आदेश बीड पोलीस अधीक्षकांनी दिले.
वर्षभरापासून बंद परेड सुरू पोलिस दलाची प्रत्येक आठवड्याला परेड असते. मात्र, मागील एक वर्षात परेड झालेली नव्हती. शुक्रवारी एसपी नवनीत काँवत यांनी स्वतः उपस्थित राहून ही परेड घेतली.
बीड पोलीस अधीक्षक नवनित कॉवत यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना शीस्तीचे धडे दिल्याने आता पोलीस दलात नक्कीच बदल होतील असे दिसत आहे.