
सारंगी महाजन यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आधार दिला व या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी बोलताना, “धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा व आमदारकीचा राजीनामा द्यायला हवा,” असे मत व्यक्त केले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यांच्यावर गंभीर आरोप होत असून, राजकीय नेते व विरोधी पक्षांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याच दरम्यान, सारंगी महाजन यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली.
या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरून तणाव वाढल्याचे दिसत आहे. धनंजय मुंडे यांनी या संदर्भात कोणतेही उत्तर दिले नसल्याने पुढील राजकीय हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी अधिक गतीने करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.