ताज्या घडामोडी

देशमुख हत्येतील आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी.

वाल्मीक कराडच्या अर्जाची सुनावणी पुढे ढकलली.

 

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी सध्या एसआयटीच्या ताब्यात आहेत. या सर्व आरोपींची एसआयटी कोठडी आज संपली आहे.वाल्मीक कारडला न्यायालयात आणले असता कराड समर्थकांनी घोषणाबाजी केल्याने न्यायालय परिसरात गोंधळ उडाल्याने या 6 आरोपींना आज बीड येथील जिल्हा न्यायालयात व्हिसीद्वारे हजर केले. तसेच एसआयटीकडून या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.या सर्व आरोपींना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यातला लॉकअप मध्ये ठेवण्यात आले होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव यासाठीच्या पथकाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष हजर न करता विशेष व्हिसीद्वारे न्यायालयात हजर केले गेले.यामधील दोन आरोपी हे तलवाडा पोलिस ठाण्यात आहेत. तर दोन गेवराई तर दोन माजलगाव पोलिस ठाण्यामध्ये आहेत. या सर्व आरोपींना या पोलिस ठाण्यामधूनच व्हिसीद्वारे न्यायालयात हजर केले आहे. मात्र, या सुनावणीत न्यायालयाने या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामध्ये सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या प्रकरणातील मुख्य आरोपी असून सिद्धार्थ सोनवणे याने संतोष देशमुख यांचे लोकेशन सांगितले असल्याचा आरोप आहे.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button