
आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर झाली आहे. अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्यासोबतच पुण्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. तर धनंजय मुंडे यांचं नाव पालकमंकत्र्यांच्या यादीतून वगळण्यात आले.
धनंजय मुंडेंना धक्का…
राज्यात सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात स्वपक्षीय व विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. पवनचक्की खंडणी व हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड सीआयडीच्या ताब्यात असल्याने विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं आहे. अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र त्यांचं नाव या यादीमधून वगळण्यात आलं आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. मात्र धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद देऊ नये अशी मागणी करण्यात येत होती. अखेर बीडचं पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडेच राहिलं आहे, मात्र धनंजय मुंडे यांना डच्चू मिळाला असून, बीडचे नवे पालकमंत्री हे आता अजित पवार असणार आहेत.