मंत्री धनंजय मुंडे,वाल्मीक कराड बाबद आ.संदीप क्षीरसागर काय म्हणाले पहा.
वाल्मीक कराडच्या मोबाईल सीडीआर तपासा सर्व सत्य बाहेर येईल.

मस्साजोग येथील पवनचक्की अधिकाऱ्यास खंडणी व सरपंच देशमुख हत्या या तपासात सीआयडीच्या ताब्यात असलेले वाल्मीक कराड यांना सुरुवातीपासूनच संरक्षण आहे. वाल्मीक कराड बाबतीत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत आता त्यांच्या संपत्तीचा बाबद तर चक्राहून सोडणारी माहिती समोर येत आहे. वाल्मीक कराडचे आता अमेरिका कनेक्शन समोर आले आहे.जर बाहेरच्या देशातून सिम कार्ड येत असतील तर त्यांचे कॉन्टॅक्ट कुठपर्यंत असतील? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला. वाल्मिक कराडला अटक होण्यासाठी उशीर झाला आहे. तपासात वाल्मिक कराडचे नाव आल्यावर वेग कुठेतरी थांबतो. त्यामुळे यामध्ये मंत्री धनंजय मुंडे चा वरदहस्त असल्याचे क्षीरसागर म्हणाले. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर देखील जे काही कटकारस्थान झाले त्यात अजूनही नावे घेण्यात आली नाहीत. मी सुरुवातीपासून सांगत आहे की मास्टर माइंड ते आहेत. त्यांना मंत्री धनंजय मुंडे यांचे संरक्षण भेटत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे क्षीरसागर म्हणाले. वाल्मीक कराडचे हात एवढ्या वरपर्यंत असतील असं तुम्हाला वाटते का? त्या काळातील मोबाईलचे सीडीआर तपासले तर सर्व काही समोर येईल असे क्षीरसागर म्हणाले, त्यावेळी प्रशासनाला फोन कोणी केले होते, आता जर काही व्यवहार तपासले तर यामागे वरदहस्त कोणाचा आहे? ते लक्षात येईल असे क्षीरसागर म्हणाले. ज्या पद्धतीने ही संपत्ती समोर येत आहे त्या पद्धतीने तपास झाला पाहिजे. व अमेरिका कनेक्शन बीड जिल्ह्यातील जनतेसमोर उघड झाले पाहिजे.अशी अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले