वाल्मीक कराड/PAI बल्लाळ यांची ऑडियो क्लिप व्हायरल.
ऑडिओ क्लिप ची चौकशी करण्यात येईल...पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत.

https://www.facebook.com/share/v/1AjDPbvLKy/
बीड दि. २३ (प्रतिनिधी):- खंडणी आणि संतोष देशमुख खून प्रकरणात चर्चेत असलेला वाल्मीक कराडची नवी ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे, यात तो बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्याशी फोनवरून बोलत असल्याचा दावा करण्यात येत आहे. सनी आठवलेवर कारवाई करू नका, तो सध्या माझ्याकडे नसला तरीही तो माझ्या भावासारखा आहे असं वाल्मीक कराड पोलीस अधिकाऱ्याला सांगतो. कराड आणि पोलीस अधिकाऱ्याच्या या क्लीपमुळे बीडमध्ये खळबळ माजली आहे. मात्र पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी हा आवाज माझा नसल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत.
* क्लिप खोटी, आवाज माझा नाही – पीआय शीतलकुमार बल्लाळ.
ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळयांनी क्लिप मधील आवाज माझा नसल्याचे स्पष्ट करत त्याचे खंडन केले आहे.पीआय बल्लाळ म्हणाले, सनी आठवले हा आमचा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याचा भाऊही गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून एका खून प्रकरणात तो फरार आहे. फरार असताना ऑडिओ क्लीप टाकत आहे. बीडमध्ये बनावट नोटा सापडल्या होत्या त्यामध्ये सनी आणि त्याचा भाऊ अक्षय आठवलेवर गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी अटक करू नये आणि दबाव यावा यासाठी सनी अशा क्लीप व्हायरल करत आहे. मात्र ही क्लीप खोटी असून त्यात माझा आवाज नाही. यात माहिती तंत्रज्ञान कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करत आहोत असं स्पष्टीकरण पोलीस अधिकारी शीतलकुमार बल्लाळ यांनी दिले.बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील हत्या आणि खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड आणि बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये वाल्मीक कराड पोलीस अधिकाऱ्याला म्हणतोय की सनीला नका गुंतवू, संशयित म्हणून, त्याची चूक झाली तो माफी मागायला लागलाय. हे आपलं पोरगं आहे, काही गोष्टीत मी मदत केली नाही म्हणून नाराज झाला. मी एसपी साहेबांशी बोलतो, हवं तर त्यांना माझा फोन आला म्हणून सांगा, स्थानिक राजकारण आहे. माझ्यावर विश्वास ठेवून त्याला मदत करा असे वाल्मीक कराड पोलीस निरीक्षकांना सांगत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. दरम्यान या क्लिपमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून सदरील क्लिपची चौकशी करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी माध्यमांना सांगितले आहे.