अवैध मुरूम वाहतूक करणारा तिप्परवर पोलिसाची कारवाई.
१८ लाखाचा मुद्देमाल जप्त.API बाळराजे दराडेची कारवाई.

बीड शहरानजीक असलेल्या डोंगर भागातील मुरूम उपसा होत असून डोंगराची अक्षरशः चाळण झाल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहावयास मिळत परवानगी न घेताच मुरूम माफिया पाली,इमामपूर,चराटा, नामलगाव परिसरातील मुरूम उत्खनन व विक्री करतात याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर धंद्यावर कारवाई करत असताना गुप्त माहितीच्या आधारे माहिती मिळाली की जालना रोडवरील महालक्ष्मी चौकामध्ये अनेक वाहनामध्ये अवैध मुरूम वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली असता.त्या हायची तपासणी केली असता महसूल प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचे निष्पन्न झाल्याने त्या वाहणाला ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.नि.बाळराजे दराडे यांनी ताब्यात घेतल.सोबत पोलीस ह.वा.मोराळे,मस्के, जगताप पोलीस नाईक नामदेव सानप, कृष्णा जायभाय यांनी तपासणी मोहीम हाती घेतली त्या मध्ये मुरुम असल्याचे व गाडी राजस्थान पासिंग चि असल्याचे त्याच्याकडे रॉयल्टी पावती किंवा गाडीची कागदपत्रे मिळून आली नाहीत गाडी कोणाची आहे असे विचारले असता चालकाने कोणाच्या नावावर आहे मला माहीत नाही अशे उत्तर दिल्याने आम्ही तो हायवा ताब्यात घेतला व पुढील कार्यवाही साठी मुख्यालयी आणला पुढील कार्यवाही साठी तहसील कार्याल व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पत्रव्यवहार केला. साधारण मुरुम व हायवा असे पकडून 18 लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला .
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नवनीत कावत सर, सह पोलीस अधीक्षक सचिन pandkar, पोलीस उप अधीक्षक विश्वंभर गोल्ड पोलीस निरीक्षक शिवाजी Bantewad यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे पोलीस ह.वा.आनंद मस्के,जगताप,पोलीस नाईक नामदेव सानप ,कृष्णा जायभाय यांनी केली.
तसेच बीड ग्रामीण हद्दीतील कोणी बेकायदेशीर रित्या वाळूचा की मुरुमचा उपसा उत्खनन किंवा वाहतुक करित असेल तर तात्काळ आम्हाला कळवा असे आवाहन पोलीस ठाणे बीड ग्रामीण यांनी केले आहे.