ताज्या घडामोडी

मंत्री धनंजय मुंडेच्या अडचणी वाढणार ?

अंजली दमानियांनी अजित पवारांकडे सादर केले बॅलन्स शीट.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता अंजली दमानिया यांनी अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. सुरुवातीपासूनच त्यांनी या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. अंजली दमानिया यांनी यावेळी काही कागदपत्रं अजित पवार यांच्याकडे सादर केली, तसेच त्यांनी अजित पवार यांच्याकडे देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

भेटीनंतर नेमकं काय म्हणाल्या दमानिया ?

अजित पवार यांची भेट घेतली, त्यांच्याकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.अजित पवार यांच्याकडे मी काही कागदपत्रं सादर केली आहेत,बीड मधील सर्व कंपन्यांच्या बॅलेन्स शीट त्यांना दिल्या. या सर्व बॅलन्स शीटवर मुडे पती-पत्नीच्या सह्या आहेत. असा दावा दमानिया यांनी केला आहे. मुंडे- कराड यांचे आर्थिक संबंध कसे आहेत,याची माहिती दादांना दिली. काही रिल्स देखील दाखवल्या, बीडमध्ये कसं दहशतीचं वातावरण आहे, याची कल्पना अजित पवार यांना दिली असं दमानिया यांनी म्हटलं आहे. त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, अजित पवार यांनी माझं बोलणं अतिशय गांभीर्यानं ऐकून घेतलं. सर्व कागदपत्रं पाहिले. त्यानंतर त्यांनी मला असं अश्वासन दिलं की ते उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, हे कागदपत्रं ते मुख्यमंत्र्यांना दाखवणार आहेत. त्यानंतर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असं अजित पवार यांनी मला सांगितल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे. दरम्यान दमानिया यांच्या या भेटीमुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान वाल्मिक कराड याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यावरून देखील अंजली दमानिया यांनी आरोप केले होते. त्याचे रिपोर्ट पाहिले, त्याला काहीही झालं नाही. तो ठणठणीत आहे, मग त्याची बडदास्त ठेवण्यासाठी त्याला रुग्णालयात नेलं होतं का? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या खंडणी प्रकरणात सहभाग असलेल्या वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांचे जवळ जवळ सर्व मालमत्ता मध्ये सहभाग असल्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होणार कशाची अंजली दमानीयांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button