
चकलांबा येथील गोरक्षक गोपाल मधुकर उणवणे वय 24 वर्षे व्यवसाय मजुरी रा.चकलांबा या गोरक्षकाला गावातीलच चौघांनी गंभीर मारहाण केल्याची घटना दिनांक 27 जानेवारी रोजी रात्री घडली असून गोपाळ उनवणे याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोपाळ ऊनवणे हा अखिल भारतीय गोसेवा संघात गौरक्षक म्हणुन काम करतो.दिनांक 27.01.2025 रोजी रात्री 09.40 वाजण्याचे सुमारास चकलांबा गावातील पोलीस स्टेशन कडे जात असतांना गावातील 1. रिहाण सय्यद 2. पिंटू सय्यद 3. अफसर चंदू शेथ 4. असलम मेहबुब कादरी सर्व रा. चकलांबा ता. गेवराई व इतर सहा ते सात जणांनी चकलाबा बस स्थानकाकडे घेऊन जाऊन विनाकारण जुन्या भांडणाचे कारण काढून शिवीगाळ करत मारहाण करण्यास करत खाली पाडून लाथाबुक्याने मारहाण करुन मुक्का मार दिला. तेव्हा रिहाण सय्यद याने खाली पडलेला दगड हातात धरुन उजव्या डोळ्याच्या खाली मारुन मला जखमी केले.ओरडण्याचा आवाज ऐकुन लगेच पोलीस स्टेशन चकलांबा येथील पोलीस पळत आल्याने वरील लोक पोलीसांना पाहून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेल.जाताना धमकी की, तु जर आम्हाला परत भेटला तर तुला जिवे सोडणार नाही. उनवणे यांना डोळ्याजवळ जखम झाल्याने पोलिसांनी उपचारासाठी सरकारी दवाखाना चकलांबा येथे पाठवले. मारहाण करणाऱ्या वरील लोकांविरुध्द तक्रार दिली असून पुढील तपास चकलांबा पोलिस करत आहेत.गोरक्षकावर झालेले हल्ल्यामुळे चकलंबा बंदीची हाक देण्यात आली.