
बीड (प्रतिनिधी)- बीडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वांभर गोल्डे हे गेल्या काही दिवसांमध्ये नागरिकांना,वकिलांना,पत्रकारांना देत असलेल्या वागणुकीमुळे वादग्रस्त ठरत असून,गेल्याच आठवड्यात बीड न्यायालय परिसरामध्ये वकील महिलाना देखील दमदाटी केल्याचा व्हिडिओ प्रसार माध्यमावर व्हायरल झाला होता. त्यामुळे संतप्त वकिलांनी डी वाय एस पी गोल्डे च्या विरोधात संताप व्यक्त केला.आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माध्यम प्रतिनिधी,पत्रकारांना अपमानास्पद आणि उध्ट्ट वागणूक दिली. वार्तांकन करतांना अडवाअडवी करणे, उध्ट्ट बोलणे नेहमीचेच झाले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आजच्या दौऱ्यातही पुन्हा याच गोष्टींची पुनरावृत्ती डीवायएसपी गोल्डे यांच्याकडून झाली आहे. सदरील प्रकाराविषयी सर्व पत्रकारांनी संताप व्यक्त करत पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.
या संदर्भात दुपारी उशिरा पत्रकारांनी अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांची भेट घेतली. डीवायएसपी गोल्डे यांच्याकडून यापुर्वीही अनेकदा असे प्रकार झालेले आहेत. जिल्ह्यातील माध्यमांनी कायम प्रशासन आणि पोलीसांना सहकार्याची भुमिका घेतलेली असतांनाही वरिष्ठ पोलीस अधिकारी अशा पध्दतीने वागणूक देत असतील तर ही बाब गंभीर असल्याचे पत्रकारांनी पोलीस अधिक्षकांना सांगितले. या संदर्भात दिलेल्या निवेदनावर संपादक, पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.