वाळू प्रकरणात तडजोड केल्याने दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत ॲक्शन मोडवर.

नवनीत कॉवत यांनी बीड पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अवैध धंदे करणाऱ्यावर बेधडक कारवाया केल्या जात असल्याने हवे धंदे करणारा चे धाबे दणाणले आहेत.तसेच जिल्ह्यातील पोलीस दलातील आपल्या कर्मचारी जर अवैध धंदे करणारा ची पाठ राखण करत असेल तर त्यावर देखील कारवाई केली जात आहे. असाच प्रकार गेवराई येथील गेवराई पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी वाळूत तडजोड करून आपला आर्थिक फायदा साधल्याने पोलीस अधिक्षकांनी या दोघांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे पुन्हा एकदा गोदापट्टा चर्चेत आला आहे. या कारवाने अवैध धंदे करणाऱ्यांशी साटेलोटे असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तर पोलीस अधीक्षक यांनी सांगितल्याप्रमाणे कारवाई करुन चुकणाऱ्याला सोडणार नाही असा इशारा दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी यापूर्वीच गोदापात्रातील तिपाले नावाच्या कर्मचाऱ्याची बदली करून भूमिका स्पष्ट केली होती. तसेच वाळू तस्करी रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलण्या संदर्भात सूचना केल्या होत्या. गेवराई पोलीस ठाण्यातील बलराम सुतार (सहाय्यक फौजदार) आणि अशोक हंबर्डे (पोलीस हवालदार) या दोन कर्मचाऱ्यांनी वाळूच्या दोन ट्रॅक्टरवर कारवाईचे आदेश असताना वाळूसह गाडी ताब्यात न घेता फक्त वाहन ठाण्यात आणून लावले आणि गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ काढूपणा करत आरोपींना साथ देण्याचे काम केले. त्यामुळे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी थेट गुरुवारी रात्री बलराम सुतार आणि अशोक हंबर्डे या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्यामुळे गोदापात्रात खळबळ उडाली. आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक न राहणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हा धडा असल्याचे पोलीस अधीक्षक यांच्या कारवाईतून दिसत असल्याची चर्चा आहे.