ताज्या घडामोडी

भीषण अपघातात तीन ठार एक जखमी.

चंदन सावरगाव जवळील घटना.

https://youtu.be/zV2ykjtomVQ?si=9wHrksFhvlGNwBu8

 

अंबाजोगाई-केज मार्गावरील चंदनसावरगाव जवळ शुक्रवारी (दि. ३१) रात्री १०.४५ च्या सुमारास दोन कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे.मृतांमध्ये अमित दिलीपराव कोमटवार (३५, रा. दिंद्रुड, ता. माजलगाव), परमेश्वर नवनाथ काळे (रा. खांडे पारगाव, बीड) आणि गणपत नारायण गोरे (४७, रा. सामनापूर, बीड) यांचा समावेश आहे.

या बाबद मिळालेली अधिक माहिती अशी की,अपघातग्रस्त कार क्रमांक (एमएच-२३/ई ६८५२) आणि (एमएच-१२/एमडब्ल्यू-३५६३) या दोन वाहनात भीषण अपघात वाहनचालकांचे नियंत्रण सुटल्याने समोरासमोर जोराची धडक झाली. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.परमेश्वर काळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमित कोमटवार आणि गणपत नारायण गोरे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे अंमलदार शेंडगे, पठाण आणि वारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परमेश्वर काळे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.गंभीर जखमी अमित कोमटवार आणि गणपत गोरे यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button