उद्या रेल्वे धावणार,बीड जिल्हा वासियांचे रेल्वेचे स्वप्न लवकरच साकार होणार.
उद्या होणार हाय स्पीड चाचणी.

बीड( प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील नागरिकांचे वर्षानुवर्षांचे स्वप्न लवकरच साकार होत आहे. अहमदनगर,बीड,परळी रेल्वेचे स्वप्न बीड जिल्हा वासियांचे लवकरच साकार होणार,असून दहा डब्यांची रेल्वे बीड रेल्वे स्टेशनच्या उंबरठ्यावर पोहोचली.काही क्षणांतच ती स्टेशनवर दाखल होणार आहे. बीड रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाले असून बिभनवाडी ते नवंघनराजुरी सी आर एस झाला असून उद्या नवघनराजुरी ते बीड या रेल्वे मार्गावर हाय स्पीड चाचणी घेण्यात येणार आहे. विभण वाडी ते बीड रेल्वे मार्गावर विद्युत काम प्रगतीपथावर सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर रेल्वे वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.
रेल्वे सेवेच्या प्रतीक्षेत असलेल्या बीडकरांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांना रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागला होता. अखेर, तो दिवस उगवला असून, बीडच्या भूमीवर रेल्वेचे आगमन होत आहे.
रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली असून, जल्लोषाचे वातावरण आहे. बीडकरांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता बीड जिल्हाही रेल्वे नेटवर्कशी जोडला जाणार असून, प्रवास अधिक सुलभ होणार आहे. यामुळे बीड जिल्ह्यावासीयात आनंदाचे वातावरण पसरले असून, रेल्वेचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.