बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार.
बीड जिल्ह्यात बिबट्याची पुन्हा दहशत.वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल.

https://youtu.be/tEh3aDVRnPs?si=wDwIE9txq5V_H6fJ
पाटोदा:- ( दि.०६) पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावातील उखारा शिवारात आज दि.६ गुरूवार रोजी दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात श्रीमती सोजरबाई धोंडीराम बोबडे वय ६५ वर्षे या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला असुन या परीसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभाग आणि पोलिस प्रशासनाला याची फोनवरून भगवान शिंदे यांना कळविण्यात आले आहे.
सविस्तर माहितीस्तव.
भगवान शिंदे यांच्या म्हणण्यानुसार श्रीमती सोजरबाई धोंडीराम बोबडे या दुपारी १२ वाजता शेतातील जनावराच्या गोठ्यात नेहमीप्रमाणे जात असतात. आज दुपारी ३ वाजता बिभिषण दासु शिंदे यांनी शेतातील जनावरे आणण्यासाठी जात असताना त्यांच्या गोठ्याशेजारी शेतात सोजरबाई यांचे प्रेत पाहीले.त्यांच्या अंगावरील जखमावरून बिबट्याने नरडीचा घोट घेतल्याचे दिसून आले. शेतात बिबट्याचे ठसे दिसुन आले.त्यांनी सोजरबाई यांच्या नातु जगन्नाथ बबन बोबडे यांना फोनवरून कल्पना दिली.त्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली. भगवान शिंदे यांनी पाटोदा वनविभागाचे अधिकारी आरएफओ श्रीकांत काळे ( मो.नं.९०७५४९५७६१ ) व पोलीस प्रशासन पोलिस निरीक्षक जाधव ( मो.नं. ७७२२०३५२०९ )यांना फोन वरून कल्पना दिली. सायंकाळी पाटोदा पोलीस प्रशासनाचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ भडके व बीट अंमलदार बाळासाहेब वाघ पाटोदा यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थळ पंचनामा केला. वनविभागाचे आरएफओ श्रीकांत काळे घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रेत शवविच्छेदनासाठी पाटोदा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याने मेंगडेवाडी गावासह इतर गावात भीतीचे वातावरण पसरले असून त्या बिबट्याचा वन विभागाणे तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.