गुंडगिरी,भाईगिरी करणाऱ्याची घेतली एसपींनी परेड.
बीड पोलीस अधीक्षक ऍक्शन मोडवर.गुन्हे केल्यास मोक्का.

बीड (प्रतिनिधी)बीड पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी एकापाठोपाठ एक धडक अॅक्शन घ्यायला सुरूवात केली आहे. आठवडाभरापुर्वीच ५१ वाळू माफियांना बोलावून त्यांची परेड घेत पोलीसी खाक्यात समज दिल्यानंतर आता गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या गुंडांची बारी आल्याचे दिसुन येत आहे. जिल्हाभरातील पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या गंभीर गुन्ह्यातील ८० जणांना पोलीसअधिक्षक काँवत साहेब यांनी आज दुपारी बोलावून घेतले होते. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या यापैकी काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येऊ शकते. याशिवाय ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्यांना समज देऊन यापुढे अशा प्रकारचे गुन्हे न करण्याबाबत तंबी दिली जाण्याची शक्यता आहे. दुपारनंतर ही परेड होणार असल्याचे समजते. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या रेकॉर्डवरील व्यक्तींनासंबंधीत ठाणेप्रमुखांनी बोलावणे पाठवले आहे. त्या अनुषंगाने दुपारी उशिरापर्यंत अनेकजण पोलीस अधिक्षक कार्यालयात दाखल होत होते. दरम्यान आजच्या या परेडच्या माध्यमातून पोलीस अधिक्षक संबंधीत व्यक्तींना यानंतर गुन्हेगारी कराल तर जेलमध्ये जाल असा दम दिला.ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे वारंवार दाखल झालेले आहेत. त्यांच्यावर हद्दपारी तसेच मोक्का लावण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले. त्यामुळे आता गुन्हेगारावर जिल्हा पोलिसांची वचक व वॉच राहणार असल्याचे दिसत आहे. वेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी देखील गुन्हेगाराची कसलीही गय केली जाणार नसल्याचे सांगून भाईगिरी करणाऱ्या वर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.