ताज्या घडामोडी
अपघातात दोघांचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी.
देवदर्शनाहून परतत असताना मुळुकवाडी जवळ अपघात.

बीड जिल्ह्यात मागील काही दिवसात अपघाताच्या प्रमाणत वाढ झाली आहे.दिनाक ७ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान मुळुकवाडी येथे भिषण अपघात झाला या अपघातात दोन जागीच ठार आणि दोन गंभीर जखमी जेजुरी वरून देवदर्शन करून गावी सोनपेठ कडे जात असताना मुळुकवाडी येथील पुलावर गाडी आदळल्याने गाडीचा चकनाचुर झाला.वाहन क्रमांक MH 22 AM 4571 या वाहानाने मुळकवाडी जवळील पूलाला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे समजते पूणाला धडक देताच गाडीचे टायर निखळुन पडले.अपघाताचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांची जखमीची नावे समजू शकली नाही.