अवैध मुरूम वाहतूक करणारा हायवा पोलिसांच्या ताब्यात.
API बाळराजे दराडे यांची कामगिरी,१८ लाखाचा मुद्देमाल जप्त.

बीड जिल्ह्यामध्ये अवैध वाळू,मुरूम, राख उत्खनन व वाहतूक करणाऱ्या विरोधात बीड पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलीस ठाणे अंतर्गत कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने आज दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर धंद्यावर कारवाया करत असताना स.पो.नि. बाळराजे दराडे यांच्या टीमने पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराने माहिती दिली की महालक्ष्मी चौक बीड बायपास रोडने काही हायवा गाड्या बेकायदेशीर रित्या मुरुम उत्खनन करून वाहतूक करत आहेत आशा माहिती मिळाली असता जालना रोडवरील महालक्ष्मी चौकत एक हायवा भारत बेझ कंपनी चि बीड च्या दिशेने येताना दिसला या हायवा गाडीला पोलिसांनी थांबवले असता त्या मध्ये अवैध मुरुम असल्याचे व गाडी च्या चालकाकडे रॉयल्टी पावती किंवा गाडीची कागदपत्रे मिळून आली नाहीत गाडी कोणाची आहे असे विचारले असता चालकाने कोणाच्या नावावर आहे मला माहीत नाही अशे उत्तर दिल्याने तो हायवा बााळराजे दराडेनी ताब्यात घेतला व पुढील कार्यवाही साठी पोलिस ठाणे बीड ग्रामीण आणला पुढील कार्यवाही साठी तहसील कार्याल व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पत्रव्यवहार केला. साधारण मुरुम व हायवा असे पकडून 18 लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला .
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नवनीत कावत सर, सह पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उप अधीक्षक विश्वंभर गोल्डे ,पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे पोलीस पो.ह.वा. मोराळे, पो. ह.मस्के, पोलीस नाईक नामदेव सानप, कृष्णा जायभाय यांनी केली. या कारवाईने हवेत वाळू, मुरूम,राख उत्खनन व वाहतूक करणाऱ्यात एकच खळबळ उडाली.
तसेच बीड ग्रामीण हद्दीतील कोणी बेकायदेशीर रित्या वाळूचा की मुरुमचा उपसा उत्खनन किंवा वाहतुक करित असेल तर तात्काळ आम्हाला कळवा असे आवाहन पोलीस ठाणे बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे API बाळराजे दराडे यांनी केले आहे.