सुदर्शन घुले,विष्णू चाटेच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर.
हत्येतील आरोपीसह पाठबळ देणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे..धनंजय देशमुख

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखयांच्या हत्याकांडातील आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे यादोघांच्या मोबाइल मधील डेटा रिकव्हर झाला असून त्यातीलकाही गोष्टी तपास पूर्ण होई पर्यंत गोपनीय ठेवण्यात आल्या आहेत.या डेटा मधून मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.अशी माहिती संतोष देशमुख यांचेबंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्याहत्याकांडाच्या तपासासंदर्भातमाहिती घेण्यासाठी धनंजय देशमुखयांनी शुक्रवारी रात्री सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतरधनंजय देशमुख यांनी माध्यमांशीबोलताना ही माहिती दिली आहे. तपासासंदर्भात दोन तीन दिवसांनीधनंजय देशमुख हे सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. आरोपी सुदर्शन घुलेच्यामोबाइलमधील डेटा रिकव्हर झालाअसून तो पूर्ण हस्तगत करण्यातआला आहे. त्याच बरोबर विष्णू चाटेच्या मोबाइल मधील डेटा रिकव्हर केला असून दोघांच्या मोबाइल मधील काही गोष्टी या तपासात अडथळा येऊ नये म्हणून तपास पूर्ण होईपर्यंत गोपनीय ठेवल्या आहेत.
तपासा बाबत देशमुख कुटुंबीय अथवा गावकऱ्यांची मदत लागल्यास घेऊ शकता असे त्यांना सांगितले आहे. वाल्मीक कराडसह सर्व आरोपींवर खुनाचा व मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे त्यांनी सांगितले. तर सर्व दोषी आरोपींसह त्यांना पाठबळ देणाऱ्या व त्यांना पोसणाऱ्या, त्यांच्याशी संबंध असलेल्या लोकांना शिक्षा झालीपाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे धनंजय देशमुख यांनीसांगितले.