
बीड शहरातील बार्शी नाका,हिना पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूस राहणारे शहेबाज सलीम मोमीन वय 20 वर्षे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.
बशीरगंज भागात शहबाजचा चायनीज सेंटर चा गाडा होता. शहाबाज हा रात्रीपासूनच बेपत्ता होता, त्याच्या कुटुंबीयांनी मोबाईलवर संपर्क करायचा प्रयत्न केला असता,मोबाईल बंद होता. रात्रीपासूनच शहाबाजची नातेवाईकडे शोधाशोध केली परंतु तो कुठेच आढळून आला नसल्याने कुटुंबीय सकाळपासून चिंतेत होते.आज दिनाक ९ फेब्रुवारी रविवार रोजी सायंकाळी शहेबांचा भाऊ छतावर गेला असता लोखंडी अँगल ला शहबाज ने गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी कुटुंबातील इतरांना व पेठ बीड पोलिसांना माहिती दिली असता पेठ बीड पोलीस ठाण्याचे API पुजारी पो.ह.संजय राठोड,पो.ह.शेख नसीर,पो.ह.अजय सानप,चालक इम्रान सय्यद यांनी घटनास्थळी जाऊन पंचनाम करून प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय बीड येथे पाठवण्यात आले. आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे.