ताज्या घडामोडी

मांजरसुंबा,कोळवाडी घाटात गळफास घेतलेल्या अवस्थेत प्रेत आढळले.

बेवारस प्रेताची ओळख पटवण्याचे ग्रामीण पोलीसाचे आवाहन.

 

बीड तालुक्यातील मांजरसुंबा कोळवाडी घाटात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलीसाना मिळाली असता पो.हे.आनंद मस्के,पो.हा.मोराळे,पो.ह.निर्धार यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मयत इसमाजवळ कोणतेही ओळखपत्र नसल्याने ओळख पटवण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या मृतदेह जवळ येरमाळा ते बीड प्रवास केल्याचे बसचे तिकीट आढळून आले.मयताचे वय अंदाजे ५५ ते ६० वर्ष असून बीड ग्रामीण पोलिसांच्या वतीने ओळख पटविण्याचे आव्हान करण्यात आले आहे सदरील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या मयत इसमा बाबत कोणास काही माहिती असल्यास त्याने बीड ग्रामीण पोलीस ठाणे येथील पो.हे.आनंद मस्के यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बीड ग्रामीण पोलिसांनी केला आहे.

संपर्क क्रमांक 

9423472034

9225092813

8888627247

9423472034

 

 

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button