वडवणीत चोरट्यांनी दुकान फोडले,लाखोचा माल लंपास,चोरटे सीसीटीव्हीत कैद.
बीड जिल्ह्यात पुन्हा चोरट्यांनी डोके वर काढले.

बीड जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातल्याचे दिसत आहे. चार दिवसापूर्वीच लिंबागणेश येथे मेडिकल दुकान फोडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा वडवणी पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर असलेले,शहरातील मध्यवर्ती भागात निवृत्ती सर्जेराव जाधव यांचे न्यु हनुमान टोबॅको सेंटर दुकांन दिनाक १० फेब्रुवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकान असून लाखोचा माल लंपास केला.
दिनाक ९ रोजी संध्याकाळी सहा वाजता दुकान बंद करून जाधव हे बाहेगव्हाण येथे घरी गेले असता दुस-या दिवशी दिनांक 10/02/2025 रोजी सकाळी आठ वाजता भाऊ ज्ञानेश्वर सर्जेराव जाधव हा दुकान उघडण्यासाठी वडवणी येथे दुकानावर आला असता दुकान उघडलेले दिसले,आत जावुन पाहीले असता पाठीमागील पत्र्याचे शटर तुटलेले,उचकटलेले दिसले.आतुन नटबोल्ट लावलेला कोंडा तुटलेला दिसला.दुकानात ठेवलेले गायछाप तंबाखुचे पुडे, रोख रक्कम, सिगारेटचे पुडे, ईनव्हेटर बॅटरी दिसले नाही, दुकानातील सामाण आस्तव्यस्त पडलेले दिसले. त्यानंतर वडवणी पोलिसांना फोन करून कळवले की, दुकानाची चोरी झाली आहे. त्यानंतर दुकानातील व आजूबाजू परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता चोरटे अशोक लेलँड पिकअप वाहनात येऊन चोरी केल्याचे दिसले. तीन चोरटे असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरा दिसले.दुकानात पाहणी केली असता दुकानातील रोख रक्कम ९५०० व सिगारेट,तंबाखू, गायछाप, इन्वर्टर बॅटरी असे सर्व मिळून 2,09,828/रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यां विरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. वडवली पोलीस ठाण्याच्या काही अंतरावरच दुकानात चोरी झाल्याने पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न पडला,वडवणी शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, रात्रीची ग्रस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी व्यापाऱ्यांनी केली आहे.