दहा दिवसापासून बीड शहरातून मुलगा बेपत्ता.
अंकुश नगर भागातून मुलगा बेपत्ता आई,वडील चिंतेत.

बीड दि. १० (प्रतिनिधी):- शहरातील अंकुशनगर भागातुन ओम विजय बहिरे मूळ गाव हिवरापाहाडी हल्ली मुक्काम अंकुश नगर बीड ओम बहिरे हा १७ वर्षीय मुलगा दि.१ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ६.१५ वाजण्याच्या सुमारास रूमवर अभ्यासाला जातो म्हणून घराबाहेर बाहेर पडला तो पुन्हा परत आलाच नाही. बहिरे कुटुंबांनी मुलाची मित्राकडे,नातेवाईकाकडे सर्वत्र शोधाशोध केली परंतु मुलगा कुठेही आढळून आला नसल्याने मुलाच्या वडीलांनी दि.२ फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.दहा दिवसापासून पोलिसांकडून मुलाचा शोध लागला नाही.
मुलाचे वर्णन उंची ५ फुट ६ इंच, रंग गोरा, अंगात पांढऱ्या रंगाचे शर्ट, निळी जिन्स पॅन्ट, पायात काळ्या रंगाचा बुट व एच.पी.ची काळ्या रंगाची सॅक. दहा दिवस उलटून देखील मुलाचा शोध लागत नसल्याने, मुलाची आज बारावीची परीक्षा असल्याने त्याचा शिवाजीनगर पोलिसांना अद्यापही शोध लागत नसल्याने कुटुंब चिंता व्यक्त करत आहे.
छायाचित्रातील मुलगा कुणाला आढळून आल्यास ९१६८२७३७७२ या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन बहिरे कुटूंबियांने केले आहे.