परीक्षेच्या पहिल्या दिवशी कॉप्याचां सुळसुळाट,विद्युत खांबावर चढून दिल्या कॉपी.
कॉपी देणे जीवावर बेतले असते,कॉफी मुक्त परीक्षा नावालाच.

बीड, (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षांना आजपासून सुरूवात झाली. बीड जिल्हा कॉफी मुक्त करण्यासाठी शिक्षण मंडळ व प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करून देखील पालक, मित्रपरिवारा कडून कॉपी पुरवली जाते असल्याचे चित्र बीड जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर दिसून आले.सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत इंग्रजीचा पहिला पेपर झाला. दरम्यान कॉपीमुक्त वातावरणात परिक्षा घेण्याच्या नियोजनाला पहिल्याच दिवशी कॉपीबहाद्दरांनी हरताळ फासल्याचे दिसून आले. जिल्हाभरातील परिक्षा केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त कडक होता. मात्र आपल्या मित्राला, पाल्यांना कॉप्या पुरवण्यासाठी काही मित्र आणि पालक थेट परिक्षा केंद्रांजवळ असलेल्या विजेच्या खांबावरून जात कॉप्या पुरवण्याचे चित्र पहायला मिळाले. काही ठिकाणी आजु-बाजुच्या इमारतीवरून उड्या मारत-मारत परिक्षा केंद्राच्या खिडक्याजवळ जावून कॉप्या पुरवतांना दिसून आले. बाहेरून गेटवर आणि आजु-बाजुला पोलिस बंदोबस्त असला तरी त्या बंदोबस्ताला न जुमानता अनेक कॉपी बहाद्दरांनी तारेवरची कसरत करत कॉप्या पुरवण्याची ‘परिक्षा’ दिली. मात्र बीड शहरातील परिक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट पहायला मिळाला. बलभीम महाविद्यालयासह इतर काही महाविद्यालयातील परिक्षा केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता.
मात्र त्या बंदोबस्ताना न झुकारता अनेकांनी कॉप्या पुरवण्याचे उद्योग अतिशय यथायोग्यरित्या पार पाडल्याचे चित्र बहुतांश परिक्षा केंद्रावर पहायला मिळाले. विद्युत रोहित्र्याच्या जवळ असलेल्या विजेच्या खांबावरून चढून स्वतःचा जीव धोक्यात घालत काही बाहेरच्या पोरांनी विनाकारण परिक्षेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला.मात्र बीड शहर पोलिसांनी तात्काळ कॉपी पुरवणाऱ्याला थांबवत,चोप दिल्याचे समजते.