नगरपरिषद सफाई कामगारास मारहाण.पेठ बीड पोलीस ठाण्यात कामगार दाखल
बीड शहरातील इस्लामपुरा भागातील घटना,पेठ बीड पोलीस ठाण्यात कामगार बसून.

बीड शहरात नगरपालिकेकडून साफसफाई चे काम सुरू असतानाच आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पेठ बीड इस्लामपुरा भागात नाले,कचरा साफसफाई करणारे कर्मचारी रामा मारुती वडमारे याला काही लोकांनी लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली.
बीड नगरपालिकाकडे सफाई कामगार व मुख्य अधिकारी निता अंधारे यांच्यामध्ये वेतन वाढीवरून काही महिन्यापूर्वी वाद झाल्याने ते प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते, सफाई कामगारावर 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे गुत्तेदाराने शंभरच्या आसपास सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले होते. त्यामुळे सफाई कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते तर एक महिलेणे झाडावर चढून देखील आंदोलन केले होते.अपुऱ्या मनुष्य बळामुळे बीड शहरात कचऱ्याचे,घाणीचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे बीड शहरात सर्वच भागात घाणच घाण दिसत असुन, जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत.
आज सकाळी इस्लामपुरा भागामध्ये रामा वाडमारे हे नाली,कचरा साफसफाई करत असताना या भागातील पाच ते सहा लोकांनी साफसफाई कामगार लाकडी दांड्याने मारहाण करत शिवीगाळ केल्याने रामा वडमारे या कामगारास गळ्याला हाताला दुखापत झाली असून मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पेठ बीड पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.