
बीड-परळी महामार्गावरील दिंद्रुड नजीक भोपा पाटीवर कंटेनरने दुचाकी स्वराला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवार (दि.१२) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी कंटेनर चालकास ताब्यात घेतले आहे.
तेलगाव-दिंद्रुड रस्त्यावरून परळीकडे जाणाऱ्या कंटेनर क्र. एम २६ बी ई ५४५६ ने तेलगाव कडे जाणाऱ्या दुचाकी (क्र.एम एच २३एस ९५७५) ला जोराची धडक दिल्याने दुचाकी चालक लक्ष्मण शिवाजी गायकवाड (रा. मुगगाव ता. बीड) हे जागीच ठार झाले.
अपघातानंतर कंटेनर चालकाने धूम ठोकली. भोपा येथील प्रत्यक्षदर्शीनी दिंद्रुड पोलिसांना तातडीने याची माहिती सांगितली. सुसाट धावत सुटलेल्या कंटेनरला पोलिसांनी व येथील तरुणांनी दोन्ही मोहखेड चौकात अडवून ताब्यात घेतले.