ताज्या घडामोडी

कुटे(तिरूमला)कंपनीतील जनरेटर दिवसाढवळ्या चोरी.व्हिडिओ पहा.

कुटे कंपनीतील जनरेटर चोरून नेताना पोलिसांनी रंगेहात पकडले.

आनंद वीर(प्रतिनिधी) ज्ञानराधा मल्टीस्टेट चे सर्वेसर्वा,अध्यक्ष सुरेश कुटे यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील ठेवीदारांना ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक केली,ठेवीदाराचे पैसे वेळेवर परत न दिल्याने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात विविध पोलीस ठाण्यात सुरेश कुटे,अर्चना कुटे, यशवंत कुलकर्णी सह संचालक मंडळावर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असल्याने सुरेश कुटे, आशिष पाटोदाकर,यशवंत कुलकर्णी हे सध्या कारागृहात असून अर्चना कुटे या फरार आहेत.

ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या जवळपास महाराष्ट्रात 52 शाखा असून त्या आयकर विभागाने कारवाई केल्याने बंद आहेत. तसेच तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज देखील बंद आहेत, मागील काही महिन्यात बीड एमआयडीसी मधील तिरुमाला कंपनीमध्ये रात्री मशनरी सह इतर साहित्य लंपास करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता तर दिवसा ढवळ्या सामानाची चोरी होत आहे. या आधी देखील तिरुमाला कंपनीतील साहित्य किती चोरीला गेले हे तपासणी देखील आवश्यक आहे.

काल दिनांक १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता एमआयडीसी भागातील तिरुमला कंपनीतील जनरेटर क्रेनच्या सहाय्याने टेम्पो चोरून नेत असल्याची गुप्त माहिती पेठ बीड पोलिसांना मिळाली असता पेठ पोलिसांनी तत्काळ एमआयडीसी भागात जाऊन जनरेटर,टेम्पो,क्रेन व दोन आरोपींना ताब्यात घेतले.

तिरूमला, कुटे ग्रुप च्या मालमत्ताचा लिलाव करून ठेवीदाराचे पैसे परत देणार असल्याचे बोलले जात आहे.मात्र कंपनीतील सामान जर दिवसाढवळ्या चोरी होत असेल तर ठेवीदाराचे पैसे कसे मिळणार?असा प्रश्न ठेवेदारांना पडला आहे.

सदाशिव ज्ञानोबा कुटे याच्या फिर्यादीवरून सुधाकर त्रिंबक गीते रा.परळी, अमोल ढेंगे रा.वंजारवाडी ता.गेवराई या दोघा विरोधात तिरूमला कंपनीतील साहित्य(जनरेटर) चोरी प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गीते व ढेंगे यांचे ज्ञानराधा मल्टीस्टेट मध्ये पैसे असल्याने ते पैसे परत मिळत नसल्याने आम्ही सामान घेऊन जात आहोत असे सांगण्यात आले. जनरेटर चोरीसाठी वापरला जाणारा टेम्पो क्रमांक MH 12 EQ 2841 व जनरेटर टेम्पोमध्ये टाकण्यासाठी वापरलेले क्रेन क्र.Mh18 AN 3850 पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पेठ बीड ठाण्याचे पोलीस कर्मचारी पो. विठ्ठल देशमुख, पो. नसेल शेख, पो. कलीम इनामदार, पो. गणेश धनवडे यांनी केली असून पुढील तपास पो.विठ्ठल देशमुख करत आहेत.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button