ताज्या घडामोडी

परळी तालुक्यातील धर्मापुरीत तेरा लाखाचा गुटखा पकडला.

क्यू आर कोड वर माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांची गुटक्यावर कारवाई.

बीड पोलीस अधीक्षक नवनीत कँवत यांनी जनतेच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी संवाद प्रकल्प ॲप सुरू करण्यात आला असून या आपला क्यू आर कोड देण्यात आला आहे. मोबाईल मध्ये क्यू आर कोड स्कॅन करून आपल्या तक्रारी किंवा माहिती देण्याचे आवाहन बीड पोलीस अधीक्षकांनी केले आहे.24 तासाच्या आत या तक्रारीचे निवारण केले जाईल असे देखील पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

क्यू आर कोड वर दिनाक 12 फेबुवारी रोजी पो. ठाणे परळी ग्रामीण हद्दीतील मौजे धर्मपुरी येथील सोमनाथ अशोक फड वबाबुराव श्रीपती मुसळे यांच्याकडे गायछाप, तंबाखू,गुटखा असल्याची माहिती क्यू आर कोड वर मिळताच बीड पोलीस अधीक्षकांनी संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

गुटखा / तंबाखुजय पदाथ असयाची गोपिनय माहितीच्या आधारे सदरची माहीती मा. पोलीस अधीसक यांनी पो, टे. परळी ग्रामीण प्रभारी अधिकारी यांना देउन कारवाई करपयाचे निर्देश दिले. त्यावर धर्मपुरी येथील सोमनाथ अशोक फड व बाबुराव श्रीपती मुसळे यांच्या किराणा दुकानावर व राहते घरी िदनांक 12 फेबुवारी रोजीदुपारी 3 ते 5 वाजेया दरयान छापा टाकला असता दोन्ही ठिकाणावरून शॉट पानमसाला, नवरतन पान मसाला, िवमल पान मसाला, तंबाखु, जाफरानी तंबाखु व इतर तंबाखुजय पदाथ असाएकुण 13, 50, 000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल परळी ग्रामीण येथे आणुन पुढील कारवाई करण्यात आली. अन्न व औषधी प्रशासन अधिकाऱ्यास याबाबतची माहिती दिली असुन अन्न व औषधी प्रशासनाच्या तपासणी नंतर गुहा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीभक नवनीत कॉवत  यांच्या मागदशनाखाली पो.नि.मजहर सयद, स.पो.नि.समाधान कवडे,प पो.उप.नी.अंकुश नमुने, रियाज शेख, पो.अं.विष्णू घुगे, पांडुरंग वाले,सुनील  अनंमवार, तुछशीराम परतवाड, सुंदर केंदे, शंकर वाघमारे सर्व नेमणुक पो.स्टे. परळी ग्रामिण यांनी केली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक यांनी सुरु केलेल्या संवाद प्रकल्प ऍपवर मिळालेल्या गोपनिय माहीतीवरुन करण्यात आलेली आहे. बीड पोलीस दलातर्फे बीड जिल्हयातील जनतेस अवाहन करण्यात येते की, संवाद प्रकल्प ऍप वर जास्तीत जास्त गोपनिय माहीती दयावी जेणे करुन अवैध धंदयावर धडाकेबाज कारवाई करता येईल असे आवाहन करण्यात आले असून माहीती देणाराचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल असेही सांगण्यात आले आहे.

 

 

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button