शिवाजी नगर पोलिसांनी केली पिस्टल जप्त.
विनापरवाना पिस्टलचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर,जिल्ह्याला शस्त्र कोण पुरवतो ?

शिवाजीनगर ठाणे हद्दीत काल दुपारी दोन गटात वाद झाल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांना मिळाली असता तत्काळ शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी गेल्याने दोन्ही गट पळापळ झाली. यावेळी हवेंत फायरिंग झाल्याच्या अफवा शहरभर पसरल्या होत्या. शिवाजीनगर पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता आकाश उर्फ बळी अंबादास पिंगळे याला ताब्यात घेतले असता याच्याकडून पिस्टल आढळून आल्याने आयुर्वेद शस्त्र वापरल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवाजीनगर पो.स्टे गु.र.न ६६८/२०२४ कलम ३५२, ३५१ (२), ३५१ (३), भा. न्या. स. सहकलम ३,२५, २७ भा. शस्त्र अधी. प्रमाणे दिनांक २७/१२/२०२४ रोजी दाखल असुन गुन्हयातील आरोपी नामे आकाश उर्फ बळी अंबादास पिंगळे वय २४ वर्षे रा. शिंदेनगर फेज १ बीड. हा गुन्हा केल्यापासुन फरार होता. दिनांक १२/०२/२०२५ रोजी माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे पोलीसांनी तात्काळ त्या ठिकाणी गेले असता नमुद आरोपी हा तेथुन अंकुश नगर भागाकडे त्याचे साथीदारासह पळून गेल्याची माहिती मिळाल्याने माहितीचे आधारे त्याचा पाठलाग करुन नमुद आरोपी यास अंकुश नगर भागातुन ताब्यात घेवुन त्यास पोलीस स्टेशन ला आणुन त्याची झडती घेतली असता ३५,००० रु किमतीचे गुन्हयात वापरलेले पिस्टल जप्त करण्यात आले.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री पांडकर, उपविभागीय पोलीस अधीकारी श्री विश्वंबर गोल्डे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. मारोती खेडकर, मपोलीस उपनिरीक्षक निता दामधर, पोहवा गणेश परजणे, पोहवा जयदीप सोनवने, पोलीस अंमलदार सुदर्शन सारणीकर, पोलीस अंमलदार विलास कांदे, पोलीस अंमलदार लिंबाजी महानोर, पोहवा बाळकृष्ण रहाडे यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात अवैध शस्त्र चा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, बीड जिल्हा शस्त्र कोण पुरवतो,विकतो यांचा शोध घेणे पोलिसापुढे एक आवाहन आहे.