
बीड जिल्ह्यात दिवसेंनदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच लिंबागणेश मांजरसुंबा रस्त्यावर देवदर्शनाहून परतत असताना चार चाकी वाहनाने पूलाला धडक दिल्याने दोघे जागीच ठार झाले होते. तर परवा रात्री दिंद्रुड जवळ टिप्परने दुचाकी ला धडकल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला ही घटना ताजी असतानाच आज दिनांक १४ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बीड बायपास रोडवर संभाजी नगरकडे जाताना गाडीवान वस्ती जवळ अपघात होऊन रस्त्यात लगतच्या खड्ड्यात गेल्याने एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले असून जखमी ना संभाजीनगर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.
बीड शहरातील गांधीनगर भागातील शिवराज गायकवाड हे सोलापूर धुळे महामार्ग वर अपघात होऊन एक ठार दोन जखमी झाले.
चारचाकी वाहन क्रमांक MH 23 BC 5379 वाहनाचे अपघात होऊन गाडी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात पलटी झाली. या यामध्ये सचिन जाधव वय 31 वर्ष रा. गांधीनगर बीड हा युवक जागीच ठार झाला असून बीड शिवराज गायकवाड ला डोक्याला गंभीर मार असल्याने उपचारासाठी संभाजीनगर येथे पाठवण्यात आले तर बालू विटकर ला बीड शहरातील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.या अपघाताची माहिती मिळतात ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार तांदळे यांनी अपघात स्थळी दाखल होऊन जखमींना पुढील उपचारासाठी दखल करण्यात आले.