ताज्या घडामोडी

बीडमध्ये वाल्मीक कराडची”बी टीम”सक्रिय..धनंजय देशमुख

कृष्णा आंधळे अद्यापही फरार कसा? बी टीम वर कारवाई करावी.

 

 

बीडः वाल्मीक कराडची “बी टीम”बीडमध्ये सक्रिय आहेत, वाल्मीक कराडच्या खंडणी व खुनतील आरोपींना मदत करत आहे असा आरोप मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे.

तसेच यांना आरोपींना न्यायालयात आणताना न्यायालय परिसरामध्ये वाल्मीक कराडचे काही गुंड प्रवर्तीचे लोक हे थांबलेले असतात.भेटीमधील चार नावे माझ्याकडे आहेत. त्याचबरोबर आरोपींना सोडायला गेलेले त्यांना सहकार्य करणारे आरोपींना मदत करणारे स्पष्ट झाल्याचे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.

आरोपी न्यायालयात ज्यावेळेस त त्यावेळेस त्यांना मदत करणारे अवतीभवती फिरणाऱ्या लोकांची नावे त्यांनी पतले नसले तरी ते बी टीममधील लोक मंत्री टवर्तीय असून वाल्मीक कराडचे देखील ते बालाजी तांदळे, संजय केदार, शिवलिंग मोराळे आणि डॉक्टर संभाजी वायबसे हे चार लोक आहेत. जे वाल्मीक कराडला पोलीस ठाण्यात भेटायला जातात. तर बालाजी तांदळे हा बऱ्याचदा कराडला भेटायला गेला होता. त्याचवेळेस धनंजय देशमुख हे देखील बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कावत यांना भेटायला गेले होते. बालाजी तांदळेने मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा फोटो धनंजय देशमुखांना दाखवला होता. त्याची तक्रार देखील देशमुख यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे केली होती. मात्र पोलीस त्यांना पकडून कारवाई का करत नाही? हा आमचा प्रश्न आहे, असे देशमुख म्हणाले.बालाजी तांदळे याने गेवराई येथे पोलीस कोठडीत असलेले आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले, महेश केदार आणि जयराम साठे यांना गाडी पुरवली होती तसेच पैसे देखील दिले होते. कोठडीत असताना ब्लँकेट व बिसलरी बाटल्या अशा प्रकारचे साहित्य पुरवणारी हीच टीम आहे. तरी अद्याप पोलिसांनी या लोकांना सहआरोपी का केले नाही? असा संतप्त सवाल धनंजय देशमुख यांनी केला आहे.

शिवलिंग मोराळे वाल्मीक कराडला सोडण्यासाठी पुण्याच्या पाषाण येथील सीआयडी कार्यालयात घेऊन गेला होता. तर डॉक्टर संभाजी वायबसेने आरोपींना फरार होण्यासाठी मदत केली होती, त्याचबरोबर फरार असल्याच्या काळामध्ये आर्थिक मदत देखील पुरवल्याचे समोर आले होते. डॉक्टर संभाजी वायबसे याला चौकशीसाठी सीआयडीने ताब्यात देखील घेतले होते. संजय केदार आणि वाल्मीक कराडचे काही शासकीय कामांमध्ये लागेबांधे आहेत. तरी देखील पोलीस यांना सहआरोपी करत नाही असा देखील आरोप देशमुख यांनी केला आहे. या सर्वांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असल्याचे देखील देशमुख यांनी सांगितले.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button