बार्शी रोड वरील अतिक्रमण पाडताना शेजारील घराच्या भिंतीला तडे.
कोणतीही पूर्व सूचना,नोटीस न देता दुकान पाडले..सुनील गायकवाड

बीड शहरात राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरू असून या रस्त्यावरील अतिक्रम हटवण्याचे काम गेल्या तीन दिवसापासून बांधकाम विभाग,नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या मदतीने बीड शहरात सुरू आहे. नगर रोड,जालना रोड,बस स्टॅन्ड तसेच बार्शी रोड वरील अतिक्रमणे काढण्यात येत असून काल दिनांक 14 फेब्रुवारी शुक्रवार रोजी बार्शी नाका चौक ते तेलगाव नाका वरील अतिक्रमण काढणे सुरुवात करण्यात आली होती.
बार्शी नाका चौकात जवळील देशी दारूचे दुकानातून 50 फुटावर हे दुकान असून तरीही या दुकानाची समोरील भिंत कोणतीही पूर्व सूचना किंवा नोटीस न देताच जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आली. सुनील गायकवाड यांनी कर्मचाऱ्याना विनंती केली होती की काही वेळे द्या मी अतिक्रमण असेल तर काढून घेतो, परंतु जाणीवपूर्वक भिंत पाडल्याने याच्या बाजूचे घर सुनील गायकवाड यांचे असून घरामध्ये पत्नी,मुलगी,आई वडील होते. तर मुलगी सकाळी शाळेत जाण्यासाठी दारात गेट जवळ उभी होती, त्यामुळे एखादी दुर्घटनात झाली असती तर जबाबदार कोण? असा सवाल गायकवाड यांनी कर्मचाऱ्यास केला. परंतु जाणीवपूर्वक माझे दुकान पाडल्याचा आरोप सुनील गायकवाड यांनी नगरपालिका व साकेत कंपनी च्या कर्मचाऱ्यावर केला. भिंत पडल्याने गायकवाड यांच्या घराला तडे गेले आहेत.त्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे.
या रस्त्यावर अनेक दुकान घरे नालीच्या बाजूलाच असून कोणती त्यांना कसलीही कारवाई करण्यात आली नसल्याने या कर्मचाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. गायकवाड यांना सूचना नोटीस न देता भिंत पाडल्याने नगरपरिपालिका व बी अँड सी कर्मचाऱ्याची तक्रार करण्यासाठी पेठ बीड पोलीस ठाण्यात गायकवाड गेले असता त्यांना सांगण्यात आले की, तुम्ही कोर्टातून तक्रार करा, करा आदेश घ्या मग आम्ही त्या तक्रारीची दखल घेऊ. त्यामुळे गायकवाड न्यायालयात तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.