
- शिवजयंती निमित्ताने महिला मराठा क्रांती ग्रुप चे पुरस्कार जाहीर
शिवमती सीताबाई बलभीमराव जाधव ,निलावती मच्छिंद्र गायकवाड ,अप्रूगा उतरेश्वर जाधव ,
पुरस्काराच्या मानकरी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त दरवर्षी कर्तृत्ववान महिलांना जिजाऊ रत्न पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार महिला मराठा क्रांती ग्रुप च्या वतीने राज्यस्तरावर दिले जातात. यावर्षी या पुरस्कारासाठी बीडच्या तीन महिलांचा समावेश करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने महिला मराठा क्रांती ग्रुप च्या वतीने राज्यस्तरावर कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार दिले जातात .त्यांच्या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने बीड येथील शिवमती सीताबाई बलभीमराव जाधव, शिवमती निलावती मच्छिंद्र गायकवाड, शिवमती अप्रुगा उत्तरेश्वर जाधव या तीन महिलांना हे पुरस्कार देण्यात येणार असून या कर्तृत्वावर महिलांचे महिला मराठा क्रांती ग्रुप च्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने या पुरस्काराचे वितरण दिनांक २० फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता शांतिनिकेतन इंग्लिश स्कूल पांगरी रोड बीड येथे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून शिवमती कुंदाताई काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवमती रत्नमालाताई धांडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन महिला मराठा क्रांती ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.