धावत्या कारने घेतला अचानक पेट.
बीड परळी रस्त्यावरील ढेकनमोह गोरक्षनाथ टेकडी जवळ घटना.

बीड परळी रस्त्यावरील ढेकनमोहा जवळील गोरक्षनाथ टेकडी च्या समोर एका धावत्या चर्चा केली अचानक पेट घेतला चालकाने प्रसांगवधान राखूत वाहन रस्त्याच्या बाजूला उभे करून वाहनील सर्वांना बाहेर काढल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
दिनांक १६ फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बीड कडून माजगावाकडे चारचाकी क्रमांक MH14FG9449 या इंडिगो धावत्या कारने अचानक पेट घेतला या कारमध्ये चार प्रवासी होते, कारने पेट घेताच सर्वांनी कार बाहेर पडले.या घटनेमध्ये जीवितहानी झाली नसली तरी कार मात्र जळून खाक झाली. ढेकनमोहा गावकऱ्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु आग अचानक वाढल्याने याची माहिती अग्निशामक दलाला दिली असता अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी येऊन आग विजवली. यामुळे बीड परळी रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली.