बीड शहरातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात.
शहरातील अतिक्रमणे काढल्याने शहरवासीयांनी घेतील मोकळा श्वास.

बीड शहरातील रस्त्याची काम प्रगतीपथावर सुरु असून नगर ते लोहा महामार्गावरील रस्त्यात येणारे अतिक्रमण काढण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून शहरात सुरू आहे. नगर रोड,जालना रोड वरील अतिक्रमणे काढल्यानंतर आता बार्शी रोड, तेलगाव रोड वरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली आहे.
आज दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळपासून बार्शी नाका ते मोमीनपुरा भागातील अतिक्रमणे काढण्यास नगरपालिका कर्मचाऱ्यांनि सुरुवात केलेली आहे. बार्शी नाका या भागात बरेच अतिक्रमणे असून, काहीही तर नालीवर बांधकाम केल्याने, पत्र्याचे शेड उभारलेले नाली तोडून रस्त्यावर पाणी येत असल्याचे निदर्शनास आले. त्यावर नगरपालिका कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण केलेल्या पत्र्याची शेड, टपरी हटवण्याचे काम सुरू केल्याने रस्त्याने मोकळा श्वास घेतला.
ही कारवाई नगरपालिका कर्मचारी सुनील काळकुटे,रुपकांत जोगदंड,शशिकांत जोगदंड, मुन्ना गायकवाड,भागात जाधव ,शेख अय्युब अतिक्रमण पथकं व सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजि भोपळेसह कर्मचाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे काढण्यात आले.
बीड शहरात सर्वच भागात, रस्त्यावर अतिक्रमण असलेल्यांनी आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत अन्यथा कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले.
बीड शहरातील सर्वच रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिका मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी दिली.