सासऱ्याने सुनेच्या डोक्यात पिस्तूल लावून दिली जीवे मारण्याची धमकी.
अंबाजोगाईतील प्रतिष्ठित कुटुंबाचा क्रूर चेहरा समोर.नवरा,दिर,सासरा,सासू,नंदावर गुन्हा दाखल.

बीड (प्रतिनिधी)- अंबाजोगाई येथील वडमारे कुटुंबा विषयी सध्या शहरभर नव्हे तर बीड जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. कारण चक्क सुनेने सासू-सासरे, नंदा आणि दीर यांच्यावर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, बीड तालुक्यातील जवळच असेल एका गावातील शेतकरी कुटुंबातील एका मुलीचा विवाह अंबाजोगाई येथील हर्षवर्धन चंद्रशेखर वडमारे या व्यक्तीशी 2 ऑगस्ट 2021 रोजी बीड येथील सूर्या लॉन्स येथे थाटात करण्यात आला. काही महिने विवाह झाल्यानंतर आनंदाचे वाटू लागले. मात्र या प्रतिष्ठित कुटुंबाचा क्रूर चेहरा हळुवार पुढे येऊ लागला. कुटुंबातील व्यक्तींनी सुन म्हणून स्विकारले नाही. तिच्याकडे माहेरावरुन पैसे आन असा तगादा लावला. पैशाची वारंवार मागणी करण्यात येऊ लागली. तिला जाणीवपूर्वक मारहाण करणे, शारीरिक, मानसिक छळ करणे असा त्रास सुरु कुटूंबातील सदस्य तीला देवू लागले. पत्ती हर्षवर्धन चंद्रशेखर वडमारे याचे बाहेर अनेक अफेअर असल्याचे पत्नीला समजले. तिने काही बोलण्या ऐवजी न बोलता काही दिवस काढले. मात्र पत्नी काहीच बोलत नसल्याने हर्षवर्धनने आपले चाळे आणि रंग हे उधळायला सुरुवात केले. मात्र क्षमतेपेक्षा अधिक या मुलीच्या डोक्याच्यावर पाणी गेल्याने तिने जाब विचारल्यावर तिला मारहाण सुरू झाली. तिचा मोबाईल फोडण्यात आला. याविषयी सासरे चंद्रशेखर वडमारे हे अंबाजोगाई शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणीच त्यांचे एक मंगल कार्यालय देखील आहे. पती हर्षवर्धन हा तीच्या पत्नीचा छळ करु लागला. सासर्याला सुनेने सांगितल्या नंतर जाणीवपूर्वक अनेक दिवस दुर्लक्ष केले. पीडित मुलीने वडिलांना सर्व हकीगत सांगितल्यानंतर काही दिवसाने डायल 112 वर तक्रार केली. चौकशीसाठी पोलीस घरी आल्यानंतर घरातील गोष्ट बाहेर जाऊ नये म्हणून मुलीला रिवाल्वरचा धाक दाखवून गप्प बसण्यासाठी धमकावले. या गोष्टीची वाच्यता जर घरा बाहेर केली तर बरं होणार नाही. याविषयी मुलीच्या घरच्यांनी देखील वारंवार पोलिसांना बोलल्यानंतर सुनेला सासरा थेट रिवाल्वर डोक्याला लावून धमकावत असल्याने ती कोणाला काही सांगत नव्हती मात्र काही दिवसांपूर्वीच अत्याचार डोक्याच्या वर गेला आणि थेट मुलीने वडिलांना फोन केला. वडिलांनी देखील तात्काळ विलंब न लावता 112 ला फोन करत पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळेस सुनेने आपली आपबीती ही पोलिसांना सांगितली. अखेर या सगळ्या प्रकरणावर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात 498 (अ) 342, 323, 504, 506, 427, 343, आणि 3/25 आर्म अँक्ट प्रमाणे तीचा पती हर्षवर्धन चंद्रशेखर वडमारे, सासरा चंद्रशेखर विष्णुपंत वडमारे, सासू अरुणा चंद्रशेखर वडमारे आणि दोन नंदा एक दीर यांच्यावर वरल कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या मुलीच्या सासर्याची मुजोरी एवढी की मुलीला नांदवायचं ही नाही आणि घटस्फोटही द्यायचं नाही. या धर्तीवर तुला काय करायचे ते करून घे. आमचं कोणी वाकड करणार नाही. अशा धमक्या मुलीला येऊ लागल्या मात्र सध्या आता मुलीचं सर्वसामान्य असलेले शेतकरी कुटुंब भयभीत वातावरणात आहे. यामध्ये मुलगी देखील नेहमीच्या टॉर्चरमुळे तणावग्रस्त अवस्थेत आहे. शेवटी महिला आयोगामध्ये ही काही तडजोड झाली नसल्याने आता ती मुलगी न्याय मागत आहे. महिला आयोगाला देखील या वडमारे कुटुंबाने दाद दिली नाही. याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर मुलगा अटक आहे. तर, रिवाल्वरचा धाक दाखवून धमकी देणारा सासरा अद्याप फरार आहे.
चौकट नंबर 1
रिवाल्वरचा धाक दाखवून पोलिसांना खरं सांगण्यासाठी केला सुनेला सासर्याने मज्जाव
गेल्या अनेक दिवसां पासून आपला नवरा आपल्यावर अत्याचार करतोय, हाणमार करतोय मात्र याचं बाहेर अनैयतिक संबंध असल्याचं ज्यावेळेस तीला कळलं त्यावेळेस तिने हा प्रकार आपल्या सासर्याला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेक वेळा सांगूनही त्यांनी या प्रकारावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील एक वेळेस पोलीस प्रशासन या प्रकरणात चौकशी करण्यास घरी येत असल्याचं सासर्याला कळल्यानंतर त्यांनी थेट सुनेच्या कपाळी रिवाल्वर लावून स्वत:च्या मुलाची चुकेवर पांघरुन घालत सदरील प्रकार पोलीसांसमोर सांगू नकोस यासाठी मज्जाव केला त्यामुळे तीने सासरा आणि पतीच्या दडपनाखाली येऊन पोलिसांना काही सांगितलं नाही. मात्र ज्यावेळेस हा सगळा प्रकार असहाय्य झाल्यानंतर तिने पोलिसांना तीची कैफियत सांगून आपल्या आई-वडिलांशी संपर्क साधत अंबाजोगाई पोलीस ठाण्यात सोबत घडत असलेल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
चौकट नंबर 2
सुनेकडून सुटकारा मिळावा यासाठी सासरा आणि तीचा पती यानी तीला तुझ्या माहेराहून पैसे आण म्हणून तगादा लावला. आपला मुलगा रंगेल आहे हे बापाला माहीत असताना सून वारंवार सांगत असताना देखील प्रत्येक वेळेस तिने केलेल्या आरोपा बद्दल काहीही ऐकुण घेतले नाही. उलट तुझ्या आई-वडीलांकडून पैसे घेवून ये नसता तु इथे राहू नकोस असा तगादा लावून तीचा सतत मानसिक व शारिरीक छळ सासरची सर्व मंडळी करु लागली. तर दुसरीकडे सासु-सासरे, पती यांनी तुला जर रहायचे असेल तर नीट रहा नसता घटस्पोट घे असे वारंवार सांगू लागले. कारण यामध्ये पतीचं भांड पत्नीने फोडलं होतं यामध्ये पती किती रंगेल आहे. त्याच्या मोबाईलमधील व्हिडिओ, फोटो आणि कॉल, मसेज देखील तिने पाहिले होते. यामुळे तीला सतत छळ, मानसिक तान, हाणमार सुरु झाला. तु माझ्या योग्य नसल्याचं पतीने सांगत पत्नीला पैशाची मागणी करत शेवटी तीने आई-वडीलांशी संपर्क साधून होणार्या त्रासाला कंटाळून अंबाजोगाई पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल केला आहे.