ताज्या घडामोडी

शहरातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात.

सुभाष रोड,स्टेडियम परिसर अतिक्रमण काढल्याने नागरिकांनी घेतला मोकळा श्वास.

 

 

बीड नगरपरिषद, बांधकाम विभाग व पोलीस कर्मचाऱ्यांनी मागील आठ दिवसापासून मुख्य रस्ता तसेच शहरातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केल्याने नागरिकांनी याचे स्वागत करून मोकळा श्वास घेतला.

नगर रोड, जालना रोड, बार्शी रोड, मोमीनपुरा या भागातील रस्त्यावरील टपरी,चहाचे गाडे, दुकानाचे होल्डिंग, नाली वरील स्लॅप अतिक्रमणे काढण्यात आली होती.

आज शुक्रवार (दि.२१) सुभाष रोडवरील अतिक्रमणांवर कारवाई केली. रस्त्यावर आलेले ओटे, शेड, हातगाडे काढून रस्ता मोकळा केला. नगरपरिषद प्रशासन व पोलीस कर्मचाऱ्यांच्या संरक्षनात अतिक्रमण काढण्यात आले.ही कारवाई मागील काही दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत विविध भागातील अतिक्रमणे काढण्यात आली. आजही मोहिम शहरातील मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या सुभाष रोडवर राबविण्यात आली. यावेळी अनाधिकृत रित्या ओटे, शेड, हात गाडे, विविध अतिक्रमण करुन अडथळा निर्माण करण्यात आलेलं अतिक्रमणांवर कारवाई केली. ही सर्व ओटे आणि इतर सर्व प्रकारचे अतिक्रमण काढून टाकली आहेत. यामुळे सुभाष रोड आता मोकळा झालेला दिसत आहे. पण सर्वच लोक पुन्हा अतिक्रमण करतातच यामुळे नगरपरिषदेने याकडे नियमित लक्ष ठेवलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सुनील काळकुटे, रुपकांत जोगदंड,शशिकांत जोगदंड, मुन्ना गायकवाड, भारत जाधव,शेख अय्युब, मुकादम साळवे अतिक्रमण पथकं किरण भिसे,पवन लाहो,सुजित जाधव, संतोष भिसे, राम रोकडे व पोलीस कर्मचारी अश्फाक सय्यद यांनी ही करावी केली.

मुख्य रस्ता तसेच शहरातील रस्त्यावर अतिक्रमण करू नये असे आवाहन बीड नगरपालिका मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी केले असून अतिक्रमणे करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button