आरटीओ कार्यालयात एजंट लाच घेताना रंगेहात पकडला.
आरटीओ कार्यालयात येणाऱ्या वाहनधारकाची सर्रास लूट. फिटनेस सर्टिफिकेट साठी दहा हजाराची मागणी.

बीड उप प्रादेशिक वाहन कार्यालयात विविध कामासाठी येणाऱ्या वाहनधारकांची सर्रास लूट होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत.या कार्यालयात येणाऱ्या वाहनधारका कडून खाजगी एजंट मार्फत पैशाची मागणी केली जाते. दुचाकी,तीन चाकी,चार चाकी सह सर्व वाहनाचे वेगवेगळे रेट कार्ड ठरलेले आहेत.तसेच वाहन परवाना,वाहन नूतनीकरण, फिटनेस, रिव्हॅलिड, बॅक लॉक यासह विविध कामासाठी उप प्रादेशिक वाहन कार्यालयात येणाऱ्या नागरिका पैसे दिल्याशिवाय कामच होत नसून फिटनेस(योग्यता) सर्टिफिकेट साठी तर वाहनधारकांनी पैसे दिले नाही तर त्यामध्ये अनेक त्रुटी काढतात जसे की इंडिकेटर, वायपर, ब्रेक लाईट,हॅन्ड ब्रेक बंद, वाहनाचे टायर, वाहनाला रेडियम कमी, वाहनावर कॅरियर असणे यासह अनेक त्रुटी काढून वाहनधारकांकडून प्रत्येक त्रुटीस १००० रुपये दर आकारला जातो. या पैशाची उपप्रादेशिक वाहन कार्यालयाकडून कोणतीही पावती दिली जात नाही. ही वाहनधारक पैसे देत नाहीत त्यांना योग्यता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ होते, परंतु जो वाहन दरात पैसे देईल त्या वाहनाचे प्रमाणपत्र आठ दिवसात दिले जाते. कार्यालयातील कागदपत्रे हे काही खाजगी एजंटच्या घरी असतात त्यामुळे कागदपत्रामुळे मध्ये बोगसगिरी होण्याचे देखील शक्यता आहे. त्यामुळे याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे गरज असून दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेक वाहनधारक करत आहेत.
आरटीओ अधिकारी रंजीत पाटील यांच्या नावाने लाचेची मागणी करत आठ हजारांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने एका खाजगी इसमाला बीड शहर ठाणे हद्दीत रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे आरटीओ विभागाचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहेत.
अब्दूल रहिम अब्दूल मजीद असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारदाराकडून टेम्पोच्या वाहनाची तपासणी केल्यानंतर फिटनेस(योग्यता) प्रमाणपत्र देण्याकरिता १० हजारांची लाच सदर आरोपीच्या स्वतः साठी व आरटीओ अधिकारी रंजीत पाटील यांच्याकरिता मागितली होती. यात तडजोडीअंती ८ हजारांची लाच स्विकारण्यात आली. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने आरोपीला लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर आरोपीच्या घराची झाडाझडती देखील सुरू आहे. हा खाजगी एजंट कोणासाठी पैसे जमा करत होता याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे.या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलिस निरीक्षक युनूस शेख, सुरेश सांगळे, भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड, अमोल खरसाडे, अंबादास पुरी यांनी केली.
या कार्यालयात जर कोणी पैशाची मागणी करत असेल,लाच मागत असेल तर बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम, एजंट कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास
* टोल फ्री क्र:- 1064
पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे ला. प्र.वि.बीड मो. 9355100100