परळी आ.सुरेश धस समोर मुंडे समर्थकांचा राडा,काळे झेंडे दाखवले.
धसाच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी.

केज मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यभरात आंदोलनाच्या माध्यमातून रान पेटवणारे भाजप आमदार सुरेश धस यांना आता परळी तालुक्यामधून विरोध होताना दिसत आहे. महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी सुरेश धस परळीकडे जात असताना सुरेश धस यांच्या वाहनाच्या ताफ्यासमोर मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी देत काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलीस समोरच दगड(फतरे)घ्या अशी चेतावणी आंदोलनकर्त्यानी दिली,परंतु पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.
आज दिनांक २२ रोजी आमदार सुरेश धस यांनी मसाजोगला जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन संतोष देशमुख यांच्या हत्याचा तपास अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सुरेश धस यांनी गावकऱ्यांना दिली.
काही महिन्यापूर्वी महादेव मुंडे यांची परळी शहरात हत्या झाली असल्याने मुंडे यांचे मारेकरी पोलिसाला अद्यापही सापडत नसल्याने महादेव मुंडे यांच्या पत्नी उपोषणास बसणार असल्याची माहिती मिळताच महादेव मुंडे कुटुंबयांच्या भेटीसाठी सुरेश धस परळी मध्ये दाखल झाले होते. मात्र या दरम्यान सुरेश धस यांना तेथील नागरिकांनी काळे झेंडे दाखवत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.”सुरेश धस चले जाव “च्या घोषणा देण्यात आल्या.आंदोलनकर्ते पोलिसाच्या वाहनाला आडवे थांबल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेताना पोलिसाची चांगलीच दमछाक उडाली होती.