ताज्या घडामोडी
बीडच्या बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांचे संघटनेचे निदर्शने

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स अंतर्गत सर्व संघटनाच्या वतीने नोकरभरती, पाच दिवसांचा आठवडा, आणि बाराव्या द्विपक्षीय करारातील उर्वरित प्रश्न या मुद्द्यांवर एक अखिल भारतीय आंदोलन पुकारण्यात आले आहे.
या आंदोलनाची सुरुवात म्हणून आज दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी बॅंक ऑफ महाराष्ट्र नगर रोड बीड या शाखेसामोर निदर्शने करण्यात आली.
यावेळी उपस्थित AIBOMEA आणि AIBOMOA संघटनेचे गोविंद कुरकुटे ,अमोल शिंदे , विपिन गिरी , सतीश ढोकणे, विशाल शिंदे , कृष्णा कवडे, अश्विनी बांगर ,राजश्री रोकडे , रामप्रसाद येवले , दिगंबर सस्ते, सुरेश खारगे ,बाबासाहेब ससाने, वसंत कांबळे, सर्व कॉम्रेड उपस्थित होते.