
महाराष्ट्रामध्ये गुटखा, तंबाखूजन्य पदार्थावर बंदी असताना बीड जिल्ह्यात खुलेआम गुटखा विक्री होते. याकडे अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्याचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून बीड जिल्ह्यातील सर्वच अवैध धंद्यांना आळा बसला आहे. बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथे गुटक्याचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांना मिळाली असता 90 राजुरी येथे जाऊन गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला.
दिनांक 24/02/2025 रोजी स.पो.नी. विजयसिंह जोनवाल,पो.उप.नि.महेश विघ्ने,पो.हवा.महेश जोगदंड,पो.हा.वा.तुषार गायकवाड, पो.ह.वा.पठाण , बप्पासाहेब घोडके व चा.पो.हवा.गणेश मारडे असे पो. स्टे बीड ग्रामीण हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पो.ह.महेश जोगदंड एल सी बी बीड यांना गोपनीय माहिती मिळाली ही इसम नामे राहुल केरबा टुले रा.नवगण राजुरी याने त्याचे राहते नवीन बांधलेल्या घरात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवला आहे. या खातरीशीर माहिती वरून रेड पार्टी सह जाऊन रेड केली असता त्याचे कडून 1) 11 गोण्या इगल 717 तंबाखू 2) 23 गोण्या हिरा पानमसाला असा एकूण 4,08,840 रू चा मुद्देमाल मिळून आला आहे.नमूद आरोपी हा पोलिस ठाणे बीड ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.त्याचे विरुद्ध सरकार तर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करणे चालू आहे.
सदरची कामगिरी नवनीत कॉवत,पोलीस अधीक्षक बीड,सचिन पांडकर यांचे मार्गदर्शन खाली पो.नी. संतोष घोडके ,पो.नी.उस्मान शेख ,स.पो.नी. विजयसिंह जोनवाल, पो उप नि महेश विघ्ने,,पो.हवा.महेश जोगदंड,तुषार गायकवाड, राजू पठाण/ ,चापोह गणेश मराडे/,पोशी बाप्पासाहेब घोडके यांनी मिळून केली आहे.