ताज्या घडामोडी

मेसच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई.

चार जणांविरोधात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

 

बीड दि. २४ (प्रतिनिधी):- शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाणे हद्दीत मेसच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील एक तर बीड जिल्ह्यातील तीन महिला आढळून आल्या.पोलिसांनी दोन महिलांसह दोन पुरुषांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस प्रशासनाकडून मिळालेली माहिती अशी की शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हॉटेलच्या जवळ एक इसम मेसच्या नावाखाली खाजगी इसमाच्या मदतीने राहत्या घरात महिलांना बोलावून वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाच्या प्रभारी अधिकारी वर्षा व्हगाडे यांनी ही माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके व संबंधीत पथकाला आदेश दिल्यानंतर छापा टाकण्याचे नियोजन करण्यात आले. त्यावरुन दोन पंच, पथकातील कर्मचारी आणि एक डमी ग्राहक हे शिवाजी नगर येथे आले. तिथे डमी ग्राहकाने थुंकून इशारा करताच पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तिथे बीड जिल्ह्यातील तीन आणि पुणे जिल्ह्यातील एक महिला आढळून आल्या. राजेंद्र प्रभाकर मुळूक (वय ५०) याच्यासह खाजगी इसम उमेश सुनीलकुमार पारीख (रा. जालना रोड, बीड) व अन्य एक महिला यांच्याविरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कार्यवाही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर,डीवायएसपी विश्वांभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.संतोष घोडके, अनैतिक मानवी प्रतिबंध पथकाच्या एपीआय वर्षा व्हगाडे,महिला अंमलदार शोभा जाधव,अनिता दगडखैर, दीपा सावंत, शालिनी उबाळे, अनिता खरमारे, मनिजा खरमाटे, सविता सोनवणे,पोलीस अंमलदार अशोक शिंदे,संजय सुरवसे, सुभाष पवार यांनी केली.या प्रकरणात सरकारतर्फे ए.पी.आय.वर्षा व्हगाडे यांनी संबंधीत दोन पुरुष व दोन महिलांविरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला.

बीड शहरात अश्या प्रकारे जर कोणी महिलाना बोलवून वेश्या व्यवसाय करत असेल तर अनैतिक मानवी प्रतिबंध(AHTU)पथकाला माहितीं द्यावी असे आवाहन API वर्षा व्हगाडे यांनी केले आहे.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button