ताज्या घडामोडी

पोलिस अधीक्षकांनी चार गुंडांना केले हद्दपार.

जिल्ह्यातील गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी पोलीस अधीक्षक एक्शन मोडवर.अनेक गुंड रडारवर.

 

बीड जिल्हयाचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बीड जिल्हयाचा कार्यभार स्वीकारल्या नंतर बीड जिल्हयात होत असलेल्या चोऱ्या, घरफोड्या, खुन व खुनाचा प्रयत्न, दंगा, जबरी चोऱ्या, दरोडा टाकणारे गुन्हेगार व लोकांना मारहान करुन गंभीर जखमी करुन जनतेमध्ये दहशत निर्माण करणारे बीड जिल्हयातील गुन्हेगारावर पोलीस अधीक्षक श्री नवनीत काँवत यांची करडी नजर आहे. असे गंभीर गुन्हे करणारे गुन्हेगारांच्या टोळयावर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्यांचे विरुध्द जास्तीत जास्त उचित प्रतिबंधक कारवाया करणे बाबत पो.स्टे. प्रभारी अधिकाऱ्यांना सुचना दिलेल्या आहेत.

पो.स्टे. प्रभारी अधिकारी केज प्रशांत महाजन यांनी बीड व लगतचे जिल्हयात टोळीने गुन्हे करणारे 1. अजय अशोक तांदळे वय 23 रा. कोरेगांव ता. केज जि.बीड 2. विकास सुभाष सावंत वय 28 रा. सावंतवाडी ता. केज जि.बीड 3. सोमनाथ राजाभाऊ चाळक वय 22 रा. लव्हुरी ता. केज जि.बीड 4. बालाजी राम लांब वय 19 रा. कोरेगांव ता. केज जि.बीड यांचे टोळीवर शरीरा विरुध्दचे व मालाविरुध्दचे गंभीर गुन्हे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, दंगा करणे, जिवेमारण्याच्या धम्मक्या देणे, अवैध शस्त्र बाळगणे, जबरी चोरी करणारे, लोकांना मारहाण करुन जखमी करुन, गुंडगिरी करुन जनतेमध्ये दहशत निर्माण करणे असे गुन्हे दाखल असल्याने व त्यांची जनतेमध्ये दहशत निर्माण होत असल्याने सदर टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी व सदर टोळीची पांगा पांग करण्यासाठी त्यांचे टोळी विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे दि.24.10.2024 रोजी हद्दपार प्रस्ताव पोलीस अधिक्षक कार्यालयास सादर केला होता. सदर प्रस्तावाची उप विभागीय पोलीस अधिकारी केज यांनी चौकशी पुर्ण केल्या नंतर पोलीस अधीक्षक बीड यांनी त्यांना दि. 10.02.2025 व दि.20.02.2025 रोजी त्यांचे म्हणने मांडण्यास संधी देऊन व त्यांचे टोळीवरील गुन्हे, लोकांमधील दहशत, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहुन, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व सदर टोळीची पांगा-पांग करणे साठी सदर टोळीस बीड, लातुर, धाराशिव जिल्हयाचे कार्यक्षेत्रातुन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे दोन वर्षे कालावधीसाठी पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी आज दि.25.02.2025 रोजी आदेश पारीत करुन हद्दपार केले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक चेतना तिडके, उप विभागीय पोलीस अधिकारी तथा सहा. पोअ श्री. कमलेश मिना, पोनि श्री. प्रशात महाजन, पोनि श्री. वैभव पाटील, पो.स्टे केज, स्थानिक गुन्हे शाखा बीड चे पो.नि. श्री. उस्मान शेख, सपोउपनि अभिमन्यु औताडे, पोह-गित्ते पो.स्टे केज पोशि- बिबिसेन चव्हाण यांनी केली आहे. भविष्यातही बीड जिल्हयात टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगांरा विरुध्द व गुंडा विरुध्द कठोर भुमीका घेवुन MPDA,MCOCA तसेच हद्दपार अशा कारवाया करण्याचे संकेत पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी दिले आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी गुंडगिरी करणाऱ्यावर कठोर पावले उचलली जाणार असून पोलीस दप्तरी नोंद असलेल्या अनेक गुंडांची गुन्ह्यांची माहिती घेऊन हद्दपारी व मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी माहिती दिली.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button