देशमुख हत्या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती.
देशमुख कुटुंबीय व लोकप्रतिनिधी उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली होती.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी दिवसाढवळ्या अपहरण करून निर्हघृण त्या करण्यात आली होती. यामुळे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात या हत्येचा निषेध करून हत्यारांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात मोर्चे काढण्यात आले होते.त्यामुळे हे प्रकरण राज्यभर गाजले होते.
हत्येतील कृष्णा आंधळे या आरोपीचा अद्यापही शोध पोलिसाला लागला नसल्याने व तपास योग्य दिशेने होत नसल्याचा आरोप करत देशमुख कुटुंबीयसह मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलनास बसले आहेत.
देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात या अशी मागणी देशमुख कुटुंबीय व बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यामुळे या मागणीचा विचार करून सरकार कडून ज्येष्ठ विधीतज्ञ उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली तर अॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.